Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हल्लाबोल… शरद पवार देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार तर ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते
राजकारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हल्लाबोल… शरद पवार देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार तर ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते

महाराष्ट्रात कधी नव्हे एवढा मोठा विजय यावेळी भाजप युतीचा होणार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 21, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २२ जुलै

शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार असून त्यांनीच भ्रष्टाचाराला राजाश्रय दिल्याचा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

केंद्रीय गृहमंत्री शहा भाजपाच्या पुण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. महाराष्ट्रात कधी नव्हे एवढा मोठा विजय यावेळी भाजप युतीचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवितांना म्हणाले, पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात त्यांचे सरकार होते त्यावेळी त्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत केंद्राकडून मोठा निधी कधीही पवारांनी महाराष्ट्रासाठी आणला नाही, उलट मोदींनी खूप मोठा निधी गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला दिला.

शरद पवार नेहमी खोटे बोलतात. ते आमच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप करतात, पण या देशात भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार जर कोणी असेल तर ते शरद पवार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातली जनता पवारांना कधीही संधी देणार नाही. पवारांनी जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली. त्यांचा पडदाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असेही शहा म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले होते. ज्यावेळी महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळते. पण ज्यावेळी शरद पवारांचे सरकार येते त्यावेळी मराठा समाजाचे आरक्षण निघून जाते. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण टिकवणारे सरकार हवे की नको असा प्रश्न शहा यांनी यावेळी विचारला.

पवारांवर टीका करतानाच शहा यांनी उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केले. औरंगजेब फॅन क्लब तुम्हाला माहिती आहे का असा प्रश्न कार्यकर्त्यांना उपस्थित करत हा आघाडीचा क्लब आहे. त्यांचा नेता कोण आहे माहित आहे का असा प्रतिप्रश्न करत त्यांचा नेता उद्धव ठाकरे असल्याचे ते म्हणाले. जे लोक कसाबला बिर्याणी देतात त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. तेच स्वतःला बाळासाहेबांचे वारस समजतात. जे आज काँग्रेस बरोबर आहे, याची उद्धव ठाकरे यांना लाज वाटायला हवी असे सांगत हा औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू शकत नसून महाराष्ट्राला फक्त भाजप सुरक्षित ठेवू शकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत राज्यात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय यावेळी भाजपला मिळणार असल्याचे सांगत निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार निश्चित बनेल. लाडकी बहीण सारखी योजना सरकारने आणली आहे. याशिवाय अनेक योजना सरकारकडून राबविल्या जात आहे. लोकसभेला जी कसर राहिली ती विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भरून काढा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 520
अमित शहा उद्धव ठाकरे शरद पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

By अनंत पांगारकरJune 14, 20260

पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला…

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.