Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुरुपौर्णिमेच्या निमित्त आमदार सत्यजीत तांबे यांना गौरव डोंगरे यांच्याकडून अनोखी गुरुदक्षिणा
राजकारण

गुरुपौर्णिमेच्या निमित्त आमदार सत्यजीत तांबे यांना गौरव डोंगरे यांच्याकडून अनोखी गुरुदक्षिणा

शब्दाला जागणारं युवा नेतृत्व म्हणुन बोटा गटात होतेय नवी ओळख
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 22, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार २२ जुलै 

गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या मार्गदर्शक, तत्वज्ञ, पाठीराख्यांचा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. गुरुचरणी आपली श्रद्धा लीन करून पुढील आयुष्य सुखकारक व्हावे ह्या आशिर्वादासह शिष्य गुरुचरणी प्रार्थना करतात.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची म्हणजे अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे पूजन बऱ्याचदा केले जाते. आई-वडील यांच्यानंतर आपण आयुष्याचे गुरु मानत असलेले गुरुचरण हे अकलापूर येथील स्वयंभू श्री. दत्तमहाराज व त्यांच्यानंतर राजकीय गुरु म्हणून आमदार सत्यजीत तांबे यांची मोलाची भूमिका असल्याचा विचार संगमनेर तालुका विद्यार्थी कांग्रेसचे अध्यक्ष गौरव डोंगरे हे मानतात.

आमदार सत्यजीत तांबे हे विधानपरिषदेवर निवडून यावेत यासाठी गौरव डोंगरे यांनी मतदानावेळी अकलापूर येथील जागृत दत्त देवस्थानाला अभिषेक करुन नवस केला होता. काल योगायोगाने गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी संगमनेर तालुक्याचे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गौरव डोंगरे यांनी आमदार सत्यजीत तांबे यांची पेढेतुला करून आपल्या नवसाची पूर्तता करत राजकीय गुरु असलेल्या सत्यजीत तांबे यांना अनोखी गुरुदक्षिणा दिली.

गौरव डोंगरे हे विद्यार्थी दशेपासून काँग्रेसच्या विविध चळवळीतून पुढे येत आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांचे खंदे समर्थक म्हणून तालुक्यात काम करत आहेत. गेले अनेक दिवसांपासुन बोटा गटात देखील त्यांनी जनसंपर्क वाढवला असुन बोटा गटात शब्दाला जागणारे, सुसंस्कृत युवानेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असुन बऱ्याचदा आगामी जिल्हा परिषदेच्या आखाड्यात देखील ते उतरु शकतात अशी चर्चा येथील नागरिकांकडुन होत असते.

गौरव डोंगरे यांनी गुरुपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी केली असून तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले अध्यात्मिक गुरु श्री. दत्त महाराज यांच्या पावनभुमीत आपले राजकीय गुरु आमदार सत्यजीत तांबे व आधारस्तंभ असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे एकत्र येणे हे आपल्या प्रामाणिक निष्ठेचे फळ असल्याचे गौरव डोंगरे यांनी सांगितले आहे.

यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक अमित भांगरे, मार्केट कमिटीचे संचालक सुरेशशेठ कान्होरे, राजहंस दुध संघाचे संचालक बबनराव कुऱ्हाडे, अकलापुर गावचे सरपंच अरुणशेठ वाघ, सुहास वाळुंज, संपत आभाळे, लहु आभाळे, नवनाथ आहेर, रमेश गपले, अक्षय ढोकरे, बाळासाहेब कुऱ्हाडे, प्रमोद कुरकुटे यांच्यासह अकलापुर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,306
गौरव डोंगरे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 14, 20260

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा ऊर्जावान राहील. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ अतिशय…

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.