Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलेसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल; अहमदनगर जिल्ह्यातील घटना
गुन्हेगारी

महिलेसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल; अहमदनगर जिल्ह्यातील घटना

कोपरगावची घटना
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 23, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २३ जुलै

महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून रविवारी रात्री तरुणाची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान सोमवारी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जमला होता. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरात महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हरून पटेल (वय २८ वर्षे, रा. आयशा कॉलनी, कोपरगाव) या तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करत हत्या केल्याचा आरोप सोहेल पटेलच्या कुटुंबियांनी केला आहे.

या संदर्भात मयत सोहेलचा भाऊ शाहरुख खान पटेल याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ११८(१)(२), १४०(१), १८९(१), १९१(३), १९१(२) व १९० नुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहरुख पटेल याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोहेल पटेल याचे एका महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपी मच्छिंद्र सोनवणे उर्फ मच्छू, स्वप्निल गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, योगेश जाधव उर्फ पोंग्या व विकीचा मित्र (सर्व रा. कोपरगाव) यांनी घरी येऊन सोहेलला (MH 15 E 4795) या क्रमांकाच्या वाहनातून घेऊन गेले त्याला कर्मवीर नगरमध्ये जावेद जमशेद शेख यांच्या शेती प्लॉटमध्ये नेऊन लाकडी दांड्याने, चाकूने, खिळे असलेल्या बांबूने मारहाण केली. यात सोहेलचा मृत्यू झाला.

खुनाच्या घटनेनंतर सकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. या जमावाने आरोपींना अटक करण्याची मागणी केली. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्मे, डीवायएसपी शिरीष वमने यांनी कोपरगावमध्ये येत जमावाला कारवाईचे आश्वासन देत शांत केले. तसेच या प्रकरणी तीन आरोपींना अटक केले असून उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे सांगितले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,746
कोपरगाव खून
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय…

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.