Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विवाहितेचा विनयभंग करणे आले अंगलट, न्यायालयाने ठोठावली दोन वर्ष सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड
न्यायालय

विवाहितेचा विनयभंग करणे आले अंगलट, न्यायालयाने ठोठावली दोन वर्ष सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड

संगमनेर न्यायालयात सुरू होता खटला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 25, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २५ जुलै

विवाहित महिलेचा विनयभंग करणे चांगलेच अंगलट आले आहे. संगमनेरच्या न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत दोन वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल संभाजी साबळे (रा. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पीडित महिलेच्या तक्रारीवरून २००९ मध्ये आरोपी अनिल साबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांनी तपास करत संगमनेर न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायाधीश प्राची पालवे यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते.

या खटल्यात सरकारी वकील राहुल शेळके यांनी पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविली. यात फिर्यादी पीडित विवाहित महिला आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीचे वकील आणि सरकार पक्षाचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पालवे यांनी आरोपीला दोषी ठरविले.

दोषी ठरलेल्या आरोपी अनिल संभाजी साबळे याला पन्नास हजार रुपये दंड आणि दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

या खटल्यामध्ये सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना हासे यांनी सहाय्य केले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,557
न्यायालय सक्तमजुरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.