Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदाराच्या उपोषणानंतरही संगमनेरमधील अवैध धंदे सुरूच…
पत्रकारिता

खासदाराच्या उपोषणानंतरही संगमनेरमधील अवैध धंदे सुरूच…

एसपी साहेब बहुचर्चित मटका, गुटखा, जुगार, वाळू तस्करी, गांजा विक्री, गांजा सिगारेट, बनावट दारू, लोटो, बिंगो, अवैध कॅफे हाऊस, भंगार, गोवंश मांस तस्करीबरोबरच दुचाकी चोऱ्या, मंगळसूत्र, गंठण, दागिने चोऱ्याच्या कोट्यावधी रुपयांच्या या उलाढालीला आशीर्वाद कोणाचे?
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 29, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २९ जुलै

अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी एलसीबीतील भ्रष्टाचाराविरोधात एल्गार देत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनामुळे लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी संगमनेरमधील अवैध धंदे सुरूच आहे. लंके यांच्या उपोषणाकडे पाठ फिरविणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांकडे देखील दुर्लक्ष केले की काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

अवैध धंद्याच्या माध्यमातून एलसीबी भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. खासदार लंके यांनी उपोषणादरम्यान जाहीर केलेल्या या भ्रष्ट शाखेच्या रेटकार्डचा जर विचार केला तर तब्बल तीस कोटी रुपयांचा हप्ता दरमहा एलसीबी गोळा करते. या रेडकार्ड मध्ये लंकेंकडून राहिलेली सर्वात मोठी हप्त्याची बाजू म्हणजे जिल्ह्यातील बेकायदा कत्तलखाने आणि भंगारची दुकाने. या दोन्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी चालत असते. त्यामुळे हा आकडा आणखी काही कोटीने वाढू शकतो. मध्यंतरी संगमनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि तत्कालीन पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या विरोधात संगमनेरकरांनी कत्तलखान्याच्या हप्तेखोरीवरून केलेले आंदोलन अद्याप संगमनेरकर विसरलेले नाही. या आंदोलनावेळी देखील पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठांकडून झाल्याचा आरोप आहे.

पोलीस प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात खासदार आणि उपोषण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदार उपोषणाला बसले म्हटल्यावर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होतील, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. जिल्हा पोलीस दल खासदारांच्या मागणीकडेच दुर्लक्ष करत असल्याने या पोलीस दलाला आणि जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्याला नक्की कोणाचे आशीर्वाद आहेत असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

खासदार लंके यांनी जाहीर केलेल्या एलसीबी भ्रष्टाचाराच्या रेटकार्डमध्ये सर्वात मोठा हिस्सा हा संगमनेरचा असेल अशी आजची येथील अवैध धंद्याची स्थिती आहे. संगमनेरमधील भंगार व्यवसाय देखील सध्या चर्चेत आहे.

अनेक चोरीची वाहने या भंगारच्या दुकानांमधून स्क्रप केली जात असल्याचे बोलले जाते. मध्यंतरी संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांनी पुढाकार घेतल्याने पोलिसांकडून भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. संशयास्पद आढळलेल्या भंगार दुकानदारांना नोटीसा देऊन त्यांचा खुलासा मागविला असला तरी, पुढे त्याचे काय झाले हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे.

एकेकाळी दंगलीचे शहर म्हणून बदनाम झालेल्या संगमनेरला सुसंस्कृत शहराची ओळख मिळत असताना आता मात्र या शहराला अवैध धंद्यांनी विळखा घातला आहे. अवैध धंद्यांचा कलंक लागलेल्या संगमनेरात गल्लोगल्ली अवैध धंद्यांची दुकाने राजरोसपणे सुरू आहेत. यात बहुचर्चित मटका, गुटखा, जुगार, वाळू तस्करी, गांजा विक्री, गांजा सिगारेट, बनावट दारू, लोटो, बिंगो, अवैध कॅफे हाऊस, भंगार, गोवंश मांस तस्करी बरोबरच दुचाकी चोऱ्या, मंगळसूत्र, गंठण, दागिने चोऱ्या सर्रासपणे सुरू आहे. यावर कारवाई करण्यासाठी नगर जिल्ह्याचे कर्तबगार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह त्यांच्या पोलीस दलाला वेळ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अवैध धंद्यामागील सूत्रधार एलसीबीच?

मध्यंतरी मटका बंद असलेल्या कालावधीत संगमनेरात एलसीबीसह स्थानिक पोलिसांनी छापे टाकत कारवाया केला. त्यानंतर झालेल्या तडजोडीनंतर सुरू झालेल्या मटक्यासह सर्वच अवैध व्यवसायांवर गेल्या दीड-दोन महिन्यात कत्तलखान्यावरील किरकोळ कारवाया वगळता एकही छापा टाकला गेला नाही ही बाब विशेष दखलपात्र ठरली आहे. अवैध व्यवसायाला एलसीबीचेच आशीर्वाद असल्याने या अवैध व्यवसायावर कारवाई तरी कोणी करायची. एलसीबीच्याच आशीर्वादाने सुरू असलेले हे धंदे खासदारांच्या उपोषणानंतर देखील बंद न झाल्याने जिल्हा अवैध धंद्याच्या विळख्यात पूर्णतः गुरफटला असल्याचे दिसते.

(क्रमशः – १)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 979
अवैध धंदे निलेश लंके
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘अच्छे दिन’ची विझणारी शेगडी!

June 9, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

By अनंत पांगारकरJune 14, 20260

पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला…

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.