Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर मुसक्या आवळल्या, दाऊद शेखला गुलबर्ग्यातून अटक; अथक प्रयत्नानंतर पोलीस पथकांना यश
गुन्हेगारी

अखेर मुसक्या आवळल्या, दाऊद शेखला गुलबर्ग्यातून अटक; अथक प्रयत्नानंतर पोलीस पथकांना यश

अतिरिक्त पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांनी दिली माहिती
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 30, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ३० जुलै

विशेष प्रतिनिधी / मुंबई

उरण हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. दाऊदचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दाऊदचे मित्र, नातेवाईकांची मदत घेतल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्य संशयित आरोपी दाऊदच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके कर्नाटकात पाठवण्यात आली होती.

उरणमध्ये एका २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला कसं पकडलं याची माहिती दिली. यासह पीडितेची हत्या कशी झाली, यावरही पोलिसांनीही भाष्य केल. तरुणी तसंच आरोपी यांच्यात मैत्री होती. मृत तरुणीचा आरोपीशी गेल्या तीन-चार वर्षांपासून संपर्क नव्हता. त्यातूनच तरुणीची हत्या झाल्याची शक्यता अतिरिक्त पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांनी व्यक्त केली.

गुरूवार, २५ जुलै रोजी उरणमधून एक २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती. बेपत्ता मुलीचा शोध सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्री कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वार करून तरुणीची हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदनानंतर निष्पन्न झालं. याप्रकरणी शनिवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीच्या हत्येप्रकरणी उरण शहरात संतापाची लाट उसळली. संशयित आरोपी दाऊद शेखला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दाऊद शेख याने तरुणीची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके कर्नाटकात पाठवली होती. आरोपीच्या मित्राने माहिती दिल्यानंतर दाऊद हा कर्नाटकातील अलार गावात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. दाऊदचा मित्र मोहसीन हा तरुणीच्या संपर्कात होता. दाऊदला अटक करण्यात मोहसीनने पोलिसांना मदत केल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणाचा तपास सुरू असून सद्यस्थिती एकच आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दाऊद शेख हा कामानिमित्त उरणमध्ये राहत होता, पण कोविडनंतर तो कर्नाटकात ड्रायव्हर म्हणून रुजू झाला. तरुणी तसंच दाऊद शेख दोघे मित्र होते. ते दोघे भेटले होते. मात्र, भेटीदरम्यान त्यांच्यात वाद झाला असावा. त्यातून आरोपीने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

दाऊद शेख मूळचा कर्नाटक इथला असून तो उरण शहरात कामानिमित्त आला होता. दाऊद हा व्यवसायानने चालक होता. पीडिता ही १५ वर्षाची अल्पवयीन असताना दाऊद शेख यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. तिच्यावर २०१९ ला त्यानं अत्याचार केले. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी उरण पोलीस ठाण्यात दाऊदविरुद्ध तक्रार दाखल केली. दाऊद शेखवर पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात त्याला शिक्षाही झाली. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून सुटला. पीडितेवर बदला घेण्यासाठीच २२ जुलैला उरणमध्ये आला. विशेष म्हणजे दाऊद हा पीडितेला फोन करुन त्रास देत असल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. उरणमध्ये आल्यावर त्याने पीडितेचा पाठलाग करायला सुरुवात केली. दाऊद पीडितेचा पाठलाग करत असल्याची बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील उघड झाली आहे.

गुरुवारी २५ तारखेला दुपारी दीड वाजता मैत्रिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर पडलेली पीडिता बराच वेळ होऊन घरी आली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी उरण पोलीस ठाण्यात पीडिता बेपत्ता असल्याची तक्रार केली. अखेर शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास उरण रेल्वे स्थानकाच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या एका निर्जन जागी पीडितेचा मृतदेह सापडला. पीडितेच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडलेले पाहायला मिळाले. तिच्या गुप्तांगावर देखील चाकूने वार केले होते. पीडितेची कपडे, टॅटू यावरून तिची ओळख पटली.

मृतदेह पाहताच तिच्या आईने हंबरडा फोडला. दाऊद शेख हा आपल्या मुलीला सतत त्रास देत होता. त्यामुळे त्यानेच आपल्या मुलीची हत्या केली असं, आई-वडिलांनी पोलिसांना सांगितलं.

वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर कुटुंबाला हातभार लागावा म्हणून पीडिता ही बेलापूर इथल्या कॉल सेंटरमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी पीडिता सर्वांशी परिचित होती. ती दररोज उरण रेल्वे स्थानक ते बेलापूर दरम्यान कामानिमित्त प्रवास करायची. पीडिता हत्याप्रकरणी उरण शहरात खळबळ उडाली. संपूर्ण उरणवासी पीडितेसाठी रस्त्यावर उतरले. संशयित आरोपी दाऊदला पकडून फाशी द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा हिशोब करू इतका रोष व्यक्त होत होता. आपल्या मुलीचा निर्घृण खून दाऊद शेख यानेच केल्याचा आरोप पीडितेचे नातलग सुरुवातीपासूनच करत होते.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,594
उरण दाऊद शेख हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

विशेष प्रतिनिधी | संगमनेर: शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाईचा बडगा…

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.