Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील त्या खून प्रकरणी अखेर दोन महिन्यानंतर आरोपीला जामीन, काय आहे घटना…
न्यायालय

संगमनेरमधील त्या खून प्रकरणी अखेर दोन महिन्यानंतर आरोपीला जामीन, काय आहे घटना…

मुख्य आरोपी अद्यापही तुरुंगात तर एक जण अजूनही फरार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 31, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ३१ जुलै 

गुन्ह्यातील सहभागाबद्दल स्वतंत्र असा सबळ पुरावा पोलिसांनी उपलब्ध न केल्याने संगमनेरमधील एका खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीला तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी जामीन मंजूर केला आहे.

मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी असे न्यायालयाने जामीन मंजूर केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाने हा जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली. संशयित आरोपी मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी याच्या विरोधात आहतेशाम अन्सारी यांच्या खुनाचा आरोप असून त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०२, १२०बी, २०१, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा दाखल आहे.

२४ एप्रिलला संगमनेर शहरालगत असलेल्या मालदाड येथील जंगलात अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले होते. तपासाअंती आढळून आलेला मृतदेह हा संगमनेर शहरातील आहतेशाम अन्सारी यांचा असल्याचे समोर आले होते. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

त्यानंतर मृत आहतेशाम अन्सारी यांच्या मुलाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मौलाना मोहम्मद जाहीर मोहम्मद युनूस मुलतानी, मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी व मोहम्मद फैजान शमोम अन्सारी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासा दरम्यान हा घातपाताचा प्रकार असल्याचे समोर आले. तब्बल महिनाभरानंतर पोलिसांनी हे खून प्रकरण उजेडात आणत मौलाना मोहम्मद जाहीर मोहम्मद युनूस मुलतानी व मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी या दोघांना अटक केली तर तिसरा आरोपी अद्यापही फरार असून दोन्ही आरोपी दोन महिन्यांपासून अटकेत आहे.

उत्तर प्रदेशच्या सहारानपुर येथून संगमनेरमध्ये आलेल्या आरोपी मौलाना मोहम्मद जाहीर मोहम्मद युनूस मुलतानी हा मृत आहतेशाम अन्सारी यांच्या बरोबरच राहत होता. त्याला फिर्यादीच्या बहिणीसोबत विवाह करायचा होता. त्यासाठी त्याने फिर्यादीच्या वडिलांकडे तसे बोलून दाखवले होते. या विवाहाला अन्सारी यांनी विरोध दाखविला. त्यामुळे आरोपीने नाराज होऊन फिर्यादीच्या वडिलांना ‘तुम्ही सरळ मार्गाने तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावले नाही तर माझ्याकडे दुसरा मार्ग आहे, मी तुम्हाला बरबाद करून टाकेल’, अशी धमकी दिली होती. त्यामुळे फिर्यादीच्या वडिलांनी त्याला घराच्या बाहेर काढले होते. यातून हे खून प्रकरण घडल्याचा संशय आहे.

अटकेत असलेल्या आरोपी मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी याने ॲड. शरीफ पठाण, ॲड. मोहसीन खान यांच्यामार्फत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्यासमोर या अर्जाचे कामकाज चालले. आरोपीचे वकील पठाण यांनी फिर्यादीने संशयाच्या आधारे फिर्याद दिल्याचे सांगितले. अर्जदाराने संगणमत करून फिर्यादीच्या वडिलांचा खून केला याचा एकही स्वतंत्र पुरावा पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले. मृतदेह २४ एप्रिलला आढळून आल्यानंतर २६ मे पर्यंत कोणतीही फिर्याद देण्यात आली नव्हती. अर्जदाराच्या ताब्यातून कोणतीही आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आलेली नाही. या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत जामीन मंजूर करण्याची मागणी केली. फिर्यादीच्या आणि सरकार पक्षाच्या युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,912
जिल्हा न्यायालय पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.