शुक्रवार, ०२ जुलै
दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी रात्री संगमनेर पोलिसांनी बेकायदा चालविल्या जात असलेल्या कत्तलखान्याच्या परिसरातून कत्तलीसाठी निर्दयतेने अन्नपाण्यावाचून डांबून, बांधून ठेवलेल्या डझनभरापेक्षा अधिक जिवंत जनावरांची सुटका करत त्यांना गोशाळेमध्ये दाखल केले. वेळेत पोलीस पोचले नसते तर या जनावरांची देखील कत्तल अटळ होती.
संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा उच्छाद सुरू या अवैध धंद्याला संगमनेर पोलिसांसह नगर पोलिसांचे आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाया होत नसल्याच्या चर्चा सातत्याने होत या संदर्भात ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलने देखील वृत्तमालिका सुरू ठेवत सातत्याने यावर प्रकाश टाकला आहे. या अवैध धंद्याचाच एक भाग असलेले संगमनेरमधील बेकायदा कत्तलखाने वारंवार टाकलेल्या छाप्यानंतर देखील सुरूच आहे. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गुरुवार, शुक्रवारी दोन दिवस येथील कत्तलखान्यात शोध मोहीम राबविली.
बघा व्हिडिओ…
त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील पोलीस हवालदार अनिल कडलग, पोलीस हवालदार राहुल डोके, पोलीस हवालदार राहुल सारबंदे पोलीस हवालदार शाम हासे यांच्या पथकाने मध्यरात्री एक ते तीन वाजे दरम्यान केलेल्या कारवाईत बारा जिवंत जनावरांना जीवदान देण्यात आले आहे.
कत्तलखान्यामध्ये जनावरांची कत्तल सुरू आहे की नाही हे बघण्यासाठी गेलेल्या या पथकाला जवळच काही अंतरावर दाट झाडीमध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने अन्न पाण्यावाचून निर्दयतेने बांधून ठेवले असल्याचे आढळून आले. दोन दिवस सलग केलेल्या या कारवाईमध्ये पथकाने १६ जिवंत गोवंश जनावरांची सुटका केली आहे. पथकाला दूर अंधारामध्ये टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केल्यानंतर ही गोवंश जातीची जनावरे आढळून आली.
दरम्यान ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने कोणी बांधून ठेवली याचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे व या गोवंश जनावरांचा ताबा मिळविण्यासाठी कोणी गो शाळेत गेल्यास त्याची देखील चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले आहे.


