Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आश्वी परिसरातील गावांमध्ये मोठी दहशत, पाण्यापर्यंत राजकारणाचे विष: आमदार बाळासाहेब थोरात
राजकारण

आश्वी परिसरातील गावांमध्ये मोठी दहशत, पाण्यापर्यंत राजकारणाचे विष: आमदार बाळासाहेब थोरात

मंत्री विखेंना घरचा आहेर देणारे डॉ. पिपाडा थोरातांच्या व्यासपीठावर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/08/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

जीएसटीमधून मिळणारा पैसा हा सरकारचा पैसा नसून तो सामान्य गोरगरिबांचा: डॉ. तांबे 

दक्षिणमध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या: प्रभावती घोगरे 

हुकूमशाहीचा राजकारणामुळे संपूर्ण तालुका अस्वस्थ: डॉ. पिपाडा 

शुक्रवार, ०२ ऑगस्ट

आश्वी परिसरातील गावांमध्ये मोठी दहशत आहे. विरोधी गावचा सरपंच असेल अथवा ग्रामपंचायत सदस्य असेल तर त्याचे पद घालविण्याचा प्रयत्न आपण कधी केला नाही. आता या उलट परिस्थिती असून विरोधी सरपंच आहे, म्हणून पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष नेऊन ठेवले आहे. पाणी योजना बंद पाडली जाते. मात्र माणसाला प्यायला पाणी देण्याच्या योजनेतही जेव्हा माणसं विष कालवतात तेव्हा अशा लोकांना माणसं विसरत नाही, जिरवाजिरवी आणि दमदाटीचे राजकारण फार काळ चालत नसल्याचा सुचक इशारा नाव न घेता राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्र्यांना दिला.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे एका कार्यक्रमात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी होते. भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, कृषी भूषण प्रभावती घोगरे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, आपण कधीही चुकीचे अथवा बदला घेण्याचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेत विकासाचे राजकारण केले. त्यामुळे जनता सातत्याने आपल्या सोबत आहे. विकास कामांमध्ये देखील कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांचीदेखील कामे केली. गत अडीच वर्षाच्या काळात या परिसरातील अनेक पाणी योजना मंजूर करतांना त्यासाठी पाठपुरावा देखील केला.

याउलट स्थिती या मतदारसंघात असून परिसरात मोठे दहशत आहे. दहा वर्ष गणेश कारखाना यांच्या ताब्यात असताना देखील त्यांना तो चालविता आला नाही. राहुरीचे तसेच झाले. यांना मात्र एकच कारखाना चालवायचा होता, असे स्पष्ट करत आमचा उद्देश आणि भावना चांगली असून आमच्या कार्यकाळात गणेश कारखाना अतिशय चांगला चालला आहे, मात्र त्यामध्ये देखील अडचणी निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. सत्तेचा गर्व जनतेने उतरविला आहे. गोरगरिबांच्या प्रपंचासोबत खेळू नका असा इशारा देतानाच संगमनेर प्रमाणेच राहता आणि शिर्डीमध्येही चांगले वातावरण निर्माण करणार असल्याचे थोरात म्हणाले.

माजी आमदार तांबे म्हणाले, भाजप सरकारने जनतेला अनेक भुलथापा दिल्या, मात्र जनतेने त्यांचा बुरखा फाडला आहे. अगदी आयोध्यामध्येसुद्धा त्यांचा पराभव झाला. जीएसटीमधून मिळणारा पैसा हा सरकारचा पैसा नसून तो सामान्य गोरगरिबांचा पैसा आहे. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रभावती घोगरे म्हणाल्या, संगमनेरमध्ये शांतता, सुसंस्कृतपणा आणि विकासाचे राजकारण आहे. मात्र आमच्या राहाता तालुक्यात दडपशाही आणि हुकूमशाही सुरू असून हम करे सो कायदा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही दुधाला भाव नाही. मात्र पाण्याची बाटली महाग आहे, अशा प्रवरेच्या नेत्यांनी गोरगरिबांना देवच आठवायला लावला असून जनता आता जागृत झाली आहे. या दडपशाही विरुद्ध आवाज उठवला जाईल. नगर लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले उमेदवार आता संगमनेरमध्ये उभे राहण्याची बतावणी करत आहे. अरे बाबा, नगर दक्षिणमध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या. वाटलं तर व्यवसाय करा, असा मिश्किल टोलादेखील त्यांनी डॉ. सुजय विखे यांना लगावला.

डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले, राहता तालुक्यामध्ये विनयभंग, ॲट्रॉसिटी सारख्या खोट्या केसेस आपण केल्या जात आहे. अत्यंत दडपशाहीचे राजकारण तालुक्यात सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरूनही राजकारण केले गेले. या हुकूमशाहीचा राजकारणामुळे संपूर्ण तालुका अस्वस्थ आहे. यासंदर्भात आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे येथील नेतृत्वाची तक्रार करणार आहोत, असे ते म्हणाले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,176
जयश्री थोरात दुर्गाताई तांबे प्रभावती घोगरे बाळासाहेब थोरात राजेंद्र पिपाडा सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.