Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या झोळे गावात वृद्धाचा खून, उकल करण्याचे तालुका पोलिसांसमोर आव्हान!
गुन्हेगारी

संगमनेरच्या झोळे गावात वृद्धाचा खून, उकल करण्याचे तालुका पोलिसांसमोर आव्हान!

संगमनेरमध्ये खळबळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/08/2024Updated:05/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०५ ऑगस्ट 

अज्ञात व्यक्तीने घराच्या पडवीत झोपलेल्या सत्तर वर्षे वयाच्या वृद्धाचा डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालत खून केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. साहेबराव भिमाजी उनवणे असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

संगमनेर तालुक्यातील झोळे गावात ही घटना घडली असून या वृद्धाचा खून कोणी आणि कशासाठी केला याची उकल करण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. साहेबराव उनवणे हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून घराबाहेर असलेल्या पडवीमध्ये झोपले होते. अज्ञात व्यक्तीने केलेल्या खुनाचा हा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला.

सकाळी घराबाहेर आलेल्या उनवणे यांच्या सुनेला ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आल्याने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. उनवणे यांचा मुलगा दीपक याने घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना कळविली.

त्यानंतर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी संशयास्पद काही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान घटनास्थळी श्वानपथक बोलाविण्यात आले असून त्याबरोबरच फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा संपूर्णतः तपास केला जाईल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दीपक साहेबराव उनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.न. ४५०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) नुसार अज्ञात आरोपी विरोधात जुना दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,196
खून झोळे संगमनेर तालुका पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar12/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समृद्धी महामार्गावर गाडी दुरुस्त करणाऱ्या मॅकेनिकला चाकूचा धाक दाखवून मारहाण…

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.