Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुष्काळग्रस्त भागासाठी निळवंडे कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची आमदार बाळासाहेब थोरातांची मागणी
शेती व सहकार

दुष्काळग्रस्त भागासाठी निळवंडे कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची आमदार बाळासाहेब थोरातांची मागणी

डाव्या उजव्या कालव्यातून पाणी सोडत बंधारे भरू द्या...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ०६ ऑगस्ट 

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायीनी ठरलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण भरले आहे. त्यामुळे निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडून दुष्काळग्रस्त भागाला पाणी देताना सर्व बंधारे भरून द्यावे, मागणी काँग्रेस नेते निळवंडे धरण आणि कालव्याचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

थोरात यांनी म्हटले आहे की, निळवंडे धरणाची निर्मिती दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी केले असून या भागाला हे धरण वरदान ठरणार आहे. गेल्या आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. मात्र निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने लाभ क्षेत्रातील ओढे नाले अद्यापही कोरडे आहेत.

पर्जन्य छायेत असलेल्या संगमनेर तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला असून तळेगावसह दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. आता धरण ओव्हरफ्लो झाल्याने अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला प्राधान्याने दिले गेले पाहिजे. लाभक्षेत्रात कमी झालेला पाऊस आणि पाणीटंचाई यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने तातडीने निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडावे त्यामुळे या भागातील बंधारे भरून घेता येतील.

पावसाळ्यात देखील तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून पिण्याच्या पाण्यासह पशुधन वाचविणे देखील जिकरीचे झाले आहे. पावसाची अशाश्वती आणि पुढील काळातील नियोजन याकरता निळवंडे कालव्यामधून येणाऱ्या ओहरफ्लोच्या पाण्यातून संगमनेर, राहता, कोपरगाव, राहुरी या तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना भविष्यातील समस्यांमधून काहीसा दिलासा मिळणार आहे.

तरी प्रशासनाने कोणताही वेळ वाया न घालवता तातडीने डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडून दुष्काळी भागातील सर्व बंधारे, पाझर तलाव भरून द्यावे, अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,317
कालवे निळवंडे धरण पाणी बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.