Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यातील गोरक्षकांवर होणारे हल्ले न थांबल्यास बजरंग दल स्टाईलने उत्तर देणार..!
गुन्हेगारी

जिल्ह्यातील गोरक्षकांवर होणारे हल्ले न थांबल्यास बजरंग दल स्टाईलने उत्तर देणार..!

बजरंग दलाचे निवेदन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/08/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १७ ऑगस्ट | संगमनेर 

स्वातंत्र्यदिनी श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या समोर गोरक्षक आशिष कोळपकर, अर्जुन मापारी, निखिल निर्मळ यांना मारहाण झाली. गो तस्कर व खाटकांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात गो तस्कर व खाटकांकडून गोरक्षकांवर होणाऱ्या हल्याचा संगमनेर बजरंग दलाने जाहीर निषेध केला.

तसेच बुधवारी (१४ ऑगस्ट) रात्री गोरक्षक मयुर विधाटे व त्याचे कुटूंबियावर गोरक्षण कार्याचा राग मनात धरुन १५० ते २०० च्या मुस्लिम समुदायाने संगनमताने व त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रासह हल्ला केला त्यात मयुर विधाटे व त्याचे कुटूंबिय गंभिर जखमी झाले आहेत व ते दवाखान्यात औषधोपचार घेत आहेत तसेच वरील झटापटीत मयुर विधाटे याच्या आईच्या अंगावर हात टाकून तिच्या गळ्यातील तिन तोळ्याचे मनीमंगळसूत्र ओरबाडून घेतले. मुस्लिम समुदायाने जाणिवपूर्वक केलेल्या सशस्त्र हल्ल्याची पोलीस स्टेशनने गांभिर्याने दखल घेतलेली नाही, असे निवेदन सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना दिले.

या गुन्ह्यात १५० ते २०० लोक गुन्हेगार असतांना केवळ ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वरील घटना घडूनही व पोलीस स्टेशनने त्याची गांभिर्याने दखल न घेतल्याने मुस्लिम समुदायाने विधाटे याच्या कुटूंबियांस तुम्ही आमच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे न घेतल्यास तुमचे हातपाय तोडू, तुम्हाला जीवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

अश्या घटना ह्या दत्तनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमुळे होत असून या खाटकांनी १० ते १२ गोरक्षकांना जीवे मारण्याची सुपारी दिली आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक अहमदनगर व उपअधिक्षक शिर्डी यांना एक महिन्यापूर्वी गोरक्षक मयुर विधाटे याचेवर प्राणघातक हल्ला होणार असल्याची माहिती पत्राद्वारे दिली होती. या पत्राची वेळेवर दखल घेतली असती तर वरील गंभिर घटना टळली असती.

तरी गुन्ह्याचे स्वरुप पहाता कोंबिंग ऑपरेशनद्वारे वरील १५० ते २०० आरोपींना तातडीने अटक करावी व त्यांचेवर कठोर कारवाई करावी. मुंबईमध्ये १५ दिवसापूर्वी भर रस्त्यात गोरक्षकाची दिवसा हत्या करण्यात आली, तशा हत्येची आपण वाट बघत आहात का? तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची नोंद घ्यावी. गोरक्षकांवर दबाव टाकण्यासाठी त्यांचेवरच खोटे गुन्हे दाखल करुन पोलीस दडपशाही करीत आहे याचा आम्ही सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दल निषेध करतो. असे निवेदन देण्यात आले.

तीन दिवसांत वरील आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सकल हिंदु समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग कोपरगांव व नगर जिल्हा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे निवेदनात म्हटले आहे.

१५ ऑगस्ट रोजी कोपरगांव शहर पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक (प्रथम खबर क्र.): ०३४६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ च्या कलम ११८(१) जबर मारहाण, १२५ जीवाला धोका, १८९ बेकायदेशीर जमाव गोळा करणे, १९० मोब जवाबदारी, १९१(२) दंगल, ३२४(४) २०००० ते १ लाख पर्यंत नुकसान केले, ३३३ बळजबरीने घरात घुसणे, ३५१(२) धमकी देणे, ३५२ शांतता भंग आणि अपमान व खुनाचा प्रयत्न करणे अश्या कलमान्वये साहीबाज अकबर शेख, शरीफ पठाण, इरफान शेख, शरीफ शेख, अमीर ऊर्फ मद्या सलीम सय्यद, अर्शद शब्बीर शेख, अमन सलीम पठाण आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हिडीओच्या माहितीच्या आधारे अजून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी यावेळी दिली.

यावेळी संगमनेर शहर पोलिस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची भेट विहिंप बजरंग दलाचे प्रशांत बेल्हेकर, गोपाल राठी, विशाल वाकचौरे, कुलदीप ठाकूर, सचिन कानकाटे, ओमकार भालेराव, आदित्य गुप्ता, कृष्णा डंबीर, समर्थ कट्यारे, किशोर गुप्ता, संकेत वराडे, हर्ष जोशी, श्लोक मुळे, प्रवीण यादव, तन्वेश देशमुख आदींनी भेट घेवून गो हत्या व अवैध कत्तलखाने कायमचे बंद करण्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली.

भगवान श्री जिव्हेश्वर जयंतीच्या सर्व साळी बांधवांना शुभेच्छा! – अनंत पांगारकर, संपादक महाराष्ट्र संवाद न्यूज.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,993
कोपरगाव बजरंग दल श्रीरामपूर संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.