
अखेर निवडणूक आयोगाने काश्मीर खोऱ्यात अन् दिल्ली सीमावर्तीय हरियाणामधे विधानसभेची निवडणूक जाहीर केली. जम्मू काश्मीरबाबत देशातील सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२३ मधे निकाल दिला देत आदेश दिला होता की, सप्टेंबर २०२४ पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया काश्मीर खोऱ्यात पूर्ण करावी. हा आदेश पाळणे त्यांना बंधनकारक आहे. हरियाणा व महाराष्ट्र यांची मुदत ऑक्टोंबरमधे संपते. मात्र राज्यातील निवडणुका जाहीर करणे अपेक्षित असताना सणसुद, अतिवृष्टी ही फालतू कारणे देवून निवडणूक आयोगाने हे सिद्ध केल की, “होय, मी केंद्र सरकारचा पोपट आहे”.
लोकसभेच्या निवडणुका घेतल्या तेव्हा कडक ४७ डिग्री तापमान ह्या निवडणूक आयोगला दिसले नाही, अन् गप्पा मारतोय पोपट अतिवृष्टीच्या. पितृपक्षाचे कारण देऊन पोपट पुढे म्हणतो की जम्मू काश्मीरमधे अनेक उत्सव आहेत, हरियाणात अनेक सण-उत्सव आहेत त्या बरोबर लोकशाहीचाही उत्सव साजरा करू. या पोपटरावची पूर्ण भिमारी उडाली आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हा आयोग काम करतो. मोदी पंतप्रधान झाल्यापासून सर्व सरकारी यंत्रणा, स्वायत्य संस्था यांची वाट लावली आहे. ह्या देशात सरकारी यंत्रणा पूर्णपणे भाजप यंत्रणा झाली आहे. भ्रष्ट कारभार हा त्यांचा मानबिंदू ठरत आहे, हे देशाचे दुर्दैव आहे.
राज्यात सुमारे ४ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूका नाहीत. सरकारी अधिकारी कसा भ्रष्ट कारभार करतात याचे अनेक नमुने रोज वृत्तवाहिनी या सोशल मीडियामधून आपण पाहत आहे. सरकारी देवस्थान जमिनी बिल्डर यांच्या घशात कश्या घातल्या जात आहेत, रस्त्याचे टेंडर कशी वाढवून दिली जात आहेत. १ किमी रस्ता करण्यास २५० कोटीहून कसा खर्च येतो याचे गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केले आहेत. राज्यात मागील २ वर्षात जो भ्रष्ट कारभार झाला तो आतापर्यंत कधीच झाला नसेल असे बोलले जाते.
राज्यातील निवडणुका हेतुपुरस्कर लांबवले आहेत. कोंबड झाकून ठेवलं म्हणजे सुर्य उगवणार नाही हा गैरसमज त्यांचा आहे. पण जनतेने पूर्ण ठरवले आहे की, भाजप-शिंदे उध्वस्त करायचे. अजित पवार थोडे तरतील पण राज्यात सर्वात जास्त हानी शिंदे यांची होईल. विदर्भात फडणवीस अडचणीत आहेत, त्यांचा पराभव अटळ आहे. नगर जिल्ह्यात विखे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागेल इतकी तयारी मतदारांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात खूप धक्कादायक निकाल असतील. महायुतीत अजित पवार यांचा पक्ष तग धरेल थोडफार, नाहीतर भाजप, शिंदे यांचा धुव्वाच आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप लाज राखेल. मराठवाड्यात उद्धव ठाकरे प्रचंड झेप घेतील. हीच झेप काँग्रेस विदर्भात घेईल. कितीही काही करा, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे हे मोदींना माहिती पडेल.
पोपटराव यांनी जरी राज्याच्या निवडणुका लांबणीवर लाडक्या बहिणीच्या नावाखाली पुढे ढकलल्या तरी बहिणीला वैरी माहिती आहेत, ती काटा काढणाराच! पोपटराव आपली स्वतःची बुद्धी वापरून निर्णय घेत जा! नाहीतर एक दिवस भारतातील जनता मिठू मिठू बोलायला नाही तर रडवायला लावील, इतकं मात्र नक्की !



