Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन लाख लागतील, दीड लाख फायनल; लाचेचा लाखाचा पहिला हप्ता घेताना मंडलाधिकारी सानप एसीबीच्या जाळ्यात
गुन्हेगारी

दोन लाख लागतील, दीड लाख फायनल; लाचेचा लाखाचा पहिला हप्ता घेताना मंडलाधिकारी सानप एसीबीच्या जाळ्यात

लाचेच्या पैशाचा हव्यास नडला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 21, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २१ ऑगस्ट

मुरूम उत्खननासंदर्भात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारदाराच्या नातेवाईक व इतरांविरुद्ध गुन्ह्यात पंचनाम्यात तक्रारदाराला लाभ मिळवून देण्यासाठी पंचा समक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एसीबीने रंगेहात पकडले आहे.

सचिन भागवत सानप (वय ३९ वर्ष) रा. एमएसजी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक चार जुना नगर नाका, बीड असे बीडच्या लाचखोर मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचखोर सानप याला लाच लचकत च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर (बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाच लुचपतकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या नातेवाईक व इतरांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात मुरूम उत्खननासंदर्भात गुन्हा दाखल असून या गुन्ह्या संदर्भाने मंडल अधिकारी सचिन सानप यांनी बीड तरफ खोड सज्जा अंतर्गत मोची पिंपळगाव येथील गट क्रमांक ४९ मधील मुरूम उत्खनन जागेचा पंचनामा केला होता.

नमूद पंचनाम्यात १००० ब्रासाऐवजी ५०० ब्रास उत्खनन दाखवून तक्रारदाराला लाभ मिळवून देण्यासाठी सानप यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी या संदर्भात बीडच्या लाच लुचपत विभागाशी संपर्क करत तक्रार केली होती.

लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता सुरुवातीला दोन लाख रुपये लाच मागणाऱ्या सानप यांनी तडजोडीनंतर दीड लाख रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्यासह पोलीस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी, सुदर्शन निकाळजे, अंबादास पुरी व गणेश मेहत्रे यांच्या पथकाने सानप याला पकडण्यासाठी बुधवारी सापळा लावला होता.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

तक्रारदाराकडून लाचेचा एक लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाचखोर मंडल अधिकारी सचिन सानप याला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगर रस्त्यावर रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागात लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,898
लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

संगमनेर: तहसील, प्रांत, दिवाणी व जिल्हा न्यायालय आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजय…

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.