गुरुवार, २२ ऑगस्ट
जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधन संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन चंदनापुरी येथील ‘विठ्ठल विसावा’ या मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून छायाचित्रकार दिन साजरा केला.
स्वच्छता दूत आदित्य घाडगे व राजेश शहा यांना प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ओंकार राठी होते. ज्येष्ठ छायाचित्रकार काशिनाथ गोसावी, राम भागवत व शांताराम कोल्हे व्यासपीठावर होते.


सकाळी सुरुवातीलाच मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यशस्वी फाऊंडेशनचे आदित्य घाडगे व त्यांची कन्या यशस्वी यांनी यासाठी मदत केली. त्यानंतर छायाचित्र, व्हिडिओ कॅमेऱ्याचे पूजन करून उपस्थितांचे मनोगत पार पडले.
यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार निसर्ग देशमुख, कैलास खोले, सतीश जम्बुकर, दीपक घुले, राम भागवत, राजू गुळवे, किरण डोंगरे, गोपाल बोराडे, संतोष शिंदे, प्रवीण थोरात, सुनील वायाळ, शहाजी काळे, निलेश शिंदे, तुकाराम भुसाळ, संतोष गाडे, गणेश यरमल, सोमनाथ आहेर, प्रकाश भालेराव, आरिफ सय्यद, वाल्मीक भास्कर, बंडू आमले, संतोष नाईकवाडी, गोविंद गोसावी, रमेश कापकर, पवन कडलग, नितीन खाटेकर, यांच्यासह संघटनेतील अनेक छायाचित्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर व उपाध्यक्ष कालीचरण पुरी यांनी परिश्रम घेतले. तर अनिल कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले.


