Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बदलापूर प्रकरणी या शहरात निघाला निषेध मोर्चा, हजारो विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशी देण्याची केली मागणी
आंदोलन

बदलापूर प्रकरणी या शहरात निघाला निषेध मोर्चा, हजारो विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशी देण्याची केली मागणी

संगमनेर मध्ये हजारो महिला, मुली रस्त्यावर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नराधम आरोपींना चौकात जिवंत जाळा – दुर्गाताई तांबे

गुरुवार, २२ ऑगस्ट

संगमनेर – बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो विद्यार्थिनी व महिलांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करत या आरोपींना फाशी देण्याची आग्रही मागणी केली. तर अशा नराधम आरोपींना चौकामध्ये जिवंत जाळा, अशी मागणी महिला नेत्या दुर्गाताई तांबे यांनी केली.

संगमनेर शहरात जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन व विविध महिला संघटनांच्यावतीने भव्य निषेध मोर्चा झाला. यामध्ये दुर्गाताई तांबे, सुनीता कोडे, अर्चना बालोडे, डॉ. श्रद्धा वाणी, सुनीता कांदळकर, शितल उगलमुगले, सुरभी मोरे, मनीषा शिंदे, नम्रता पवार, अमृता राऊत, यांच्यासह ३ हजार मुली सहभागी झाल्या होत्या.

सह्याद्री विद्यालयापासून निघालेल्या या मोर्चात विद्यार्थिनींनी नवीन नगर रोड, लिंक रोड, पुणे-नाशिक हायवे ते बस स्थानक अशा निषेध मोर्चात नराधम आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. फाशी द्या, फाशी द्या आरोपींना फाशी द्या. मुलगी वाचवा, देश वाचवा, फुल नही, चिंगारी है, ये भारत की नारी है, अशा घोषणा देऊन या आरोपींना तात्काळ फाशी द्या अशी मागणी केली.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, काही समाजकंटकांना महिलांना पुन्हा पारतंत्र्यात न्यायचे आहे. पूर्वी महिलांना सती जाण्यासाठी जाळले जायचे. आता हजारो महिलांची गर्भपात करून जीव घेतले जात आहेत. महिलांना घटनेने अधिकार दिला आहे. परंतु तो हिसकावून घेतला जात आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. परंतु अजूनही त्यांना हीन वागणूक दिली जात आहे. काही नराधम समाजकंटक लहान-लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना खुडून टाकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो मुली घाबरल्या आहेत. पालक मुलींना शाळेत पाठवायला तयार नाहीत.

आम्ही लहानपणी मुक्त फिरायचो, त्यावेळेस सर्वांचे जीवन चांगले गेले. परंतु या आत्ताच्या लहान मुलींचे कसे होणार असे सांगताना दुर्गाताई तांबे यांना अश्रू अनावर झाले. याचबरोबर अशा नराधम समाजकंटकांना भर चौकात जाळा, अशी मागणी ही त्यांनी केली.

यावेळी प्रा बाबा खरात, मिलिंद औटी यांच्यासह अनेक शिक्षक, शिक्षिका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

बघा मोर्चाची आणखी छायाचित्रे…

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 808
दुर्गाताई तांबे निषेध मोर्चा बदलापूर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.