Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बंद नाही मौन निषेध! काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांचे ‘लाडक्या लेकीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी’ हातात काळे झेंडे घेत तोंडाला काळीपट्टी लावत आंदोलन!
आंदोलन

बंद नाही मौन निषेध! काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांचे ‘लाडक्या लेकीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी’ हातात काळे झेंडे घेत तोंडाला काळीपट्टी लावत आंदोलन!

महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २४ ऑगस्ट

बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी राज्यात महाविकास आघाडीने सरकार विरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरविल्याने मविआने निषेध आंदोलन केले.

संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी बस स्थानक चौकात तोंडाला काळ्या पट्ट्या लावत मौन आंदोलन केले. त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात सहभागी झाले होते.

बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा व असंवेदनशील सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आज शनिवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, माननीय उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने सदर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला.

शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना २४ ऑगस्ट किंवा त्यानंतरच्या कोणत्याही तारखेला प्रस्तावित महाराष्ट्र बंदची हाक देण्यास मनाई केली होती. अशा आंदोलनांमुळे सामान्य जनजीवन प्रभावित होईल, असे न्यायालयाने म्हटले होते. खंडपीठाने जुलै २००४ च्या उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की बंद किंवा संप हे असंवैधानिक कृत्य मानले जाईल.

त्यामुळे थोरात यांच्यासह संगमनेरमध्ये ‘लाडक्या लेकीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी’ दोन तास सुरू असलेल्या या मौन निषेध जन आंदोलनात बाबा ओहोळ, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, सुरेश थोरात, दिलीप पुंड, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, शहर प्रमुख आप्पा केसेकर, नरेश माळवे, ॲड. दिलीप साळगट, कैलास वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर गायकर, किरण घोटेकर आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी शरद पवार गट, आरपीआय व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान महाविकास आघाडीने बंद मागे घेतला असला तरी संगमनेरमध्ये बहुतांशी व्यावसायिकांनी स्वतःहून आपले व्यवसाय बंद ठेवत निषेध व्यक्त केला. शहरातील अन्य व्यवहार सुरळीत सुरू होते.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,134
जयश्री थोरात दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात महाविकास आघाडी मौन आंदोलन सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

By Annant Ppangarkar12/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून…

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.