Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भटके विमुक्त, आदिवासींच्या हक्कासाठीची राज्यव्यापी संवाद यात्रा ४ सप्टेंबरला संगमनेरमध्ये, मेळाव्याचे करणार आयोजन
सामाजिक

भटके विमुक्त, आदिवासींच्या हक्कासाठीची राज्यव्यापी संवाद यात्रा ४ सप्टेंबरला संगमनेरमध्ये, मेळाव्याचे करणार आयोजन

नियोजनासाठी शासकीय विश्रामगृहावर पार पडली बैठक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २५ ऑगस्ट  
भटके विमुक्त व आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संवाद यात्रा पुण्यातून २८ ऑगस्टला निघत आहे. २३ सप्टेंबरला मुंबईत या यात्रेचा समारोप होईल. यादरम्यान ४ सप्टेंबरला ही यात्रा संगमनेरला येत असून यासाठी भटके विमुक्त, आदिवासी संयोजन समितीची नियोजन बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली.
७२ या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त, आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा काढली जात आहे. संगमनेरमध्ये यात्रा आल्यानंतर यात्रेच्या स्वागत आणि समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात भटके विमुक्त आणि आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करून स्थानिक खासदार व आमदारांना पत्र घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
संवादयात्रा भटक्या विमुक्त आदिवासींच्या वसाहतींना भेट देऊन, त्यांच्याशी संवाद साधून, भटके विमुक्त, आदिवासी जमातीतील विविध संस्था, संघटना, गट, पंचायती, समाज, कार्यकर्ते यांना एकत्र जोडून त्यांच्या हक्कासाठी ही संवादयात्रा अभुतपुर्व, ऐतिहासिक व क्रांतिकारी ठरणार आहे. या बैठकीस जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये रवींद्र गिरी, नंदू बोऱ्हाडे, विमलताई सावंत, शुभम शिंदे, रोशन गोफणे, मनोज तामचिकर, विजय पवार, बाळासाहेब येरमल, ओंकार बडवे, संदीप आखाडे आदी उपस्थित होते.
भटके विमुक्त आदिवासी समुदायाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठीच्या या आहेत प्रमुख मागण्या…

  • महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भटके विमुक्तासाठी स्वतंत्र मंत्रालय व त्यासाठी भटके विमुक्त जमातीतीलच मंत्र्याची नेमणूक करावी.
  • भटके विमुक्तांची जातिनिहाय जनगणना करावी.
  • न्या. अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शासन निर्णयानुसार १४ विमुक्त व २८ भटक्या जमातींचा सर्वकष अभ्यास करून अनुसूचित जाती-जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत केंद्र सरकारला सादर केलेल्या शिफारसीनुसार तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
  • केंद्रीय पातळीवर सर्व भटके विमुक्त समुहाचे एकत्रीकरण करावे.
  • भटके विमुक्त कल्याणासाठी पर्याप्त बजेट असावे. व आदिवासींसाठी बजेटचा कायदा करण्यात यावा.
  • बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर भटक्या विमुक्ताच्या कल्याणासाठी विचाराधीन असणारी वनार्ती ( वसतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) तात्काळ कार्यान्वित करावी.
  • अनुसूचित जाती, जमाती यांच्यावरील होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी प्रतिबंध घालण्यासाठी असणाऱ्या कायद्यामध्ये (Atrocity act ) मुळ भटके, विमुक्त जातीचा समावेश करून त्यांना संरक्षणकवच मिळावे.
  • भटके, विमुक्त जमातीचे पारंपारिक व्यवसाय जसे की, कटलरी विकणे, भंगार गोळा करणे आदी कामासाठी त्यांना परवाने व ओळखपत्र शासकीय स्तरावरून मिळावे.
  • भटक्या, विमुक्त जमातीतील मुलांना बालवाडी ते पदवीत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे. या समुहातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृहे असावीत. भटके विमुक्त, आदिवासी मुलांच्या मातृभाषेचा वापर करून शिक्षण देणे.
  • भटके विमुक्त आदिवासी समुदायातील युवक-युवतींना छात्रवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्याच्या सर्व विद्यापीठांमध्ये ‘विमुक्त जाती व भटक्या जमातीं अध्यासन व संशोधन केंद्र’ स्थापन करणे.
  • नागरिकत्व पुरावे मिळविण्यासाठी एक खिडकी पद्धत असावी. महाराष्ट्र शासनांनी भटके विमुक्त आदिवासी समाजाचे नागरिकत्व पुराव्यांचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनास नागरिकत्व पुरावे काढून देण्याच्या अनुषंगाने दर दोन महिन्यांनी शिबीर, मेळावा आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा.
  • भटके विमुक्त, आदिवासी समाजाच्या योगदानाला मान्यता देणे आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ३१ ऑगस्ट हा दिवस ‘विमुक्त दिन’ म्हणून घोषित करण्यात यावा. विमुक्त दिनाच्या निमित्ताने १६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या पंधरवड्यात राज्यभर ‘भटके विमुक्त पंधरवडा’ साजरा करण्यात यावा.
  • समाजाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या पंधरवड्यात “शासन भटके विमुक्त्यांच्या दारी” ही संकल्पना राबविणे, यामुळे समाजाच्या समस्यांवर चर्चा होईल आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्यास शासनाला मदत होईल.
  • या घटकांप्रती प्रशासनास संवेदनशील करणे. महाराष्ट्र शासनाने जिल्हा प्रसाशनासह सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावे की, त्यांनी प्रत्येक जिल्हा आणि ग्रामपंचायतीच्या स्तरावर ‘भटके विमुक्त आदिवासी विकास आराखडा’ तयार करावा. या आराखड्यात भटके विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिकांना जागा, घर, शिक्षण, आरोग्य, मनरेगा योजनेद्वारे रोजगार आणि वस्तीत पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबतचे स्पष्ट नियोजन करावे.
  • भटके विमुक्त जमातीतील धनगर, रामोशी व वडार या स्वतंत्र जमातीसाठी असणाऱ्या महामंडळाचा लाभ सर्व भटके विमुक्त जमातीला देण्यात यावा.
  • भटके विमुक्त, आदिवासी यांचे गायरान, गावठाण, वनजमीन व इतर निवासी व उपजिवीका अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्यात यावे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,085
बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – श्रीरामपूर शहरातील संशयास्पद आणि बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांनी…

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.