Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रोटरीच्या रक्षाबंधन सोहळ्यात माजी सैनिकांनी सांगितले युद्धाचे थरारक अनुभव
सामाजिक

रोटरीच्या रक्षाबंधन सोहळ्यात माजी सैनिकांनी सांगितले युद्धाचे थरारक अनुभव

सैनिकांच्या जीवावरच देशातील जनता सुखी व चांगले जीवन जगू शकते: साबळे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 26, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २६ ऑगस्ट 

संगमनेर रोटरी क्लबने माजी सैनिकांसाठी आयोजित केलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात युद्धभूमीवर लढलेल्या माजी सैनिकांनी युद्धाचे थरारक प्रसंग आणि यादरम्यान स्वतः त्यातून कसे बाहेर पडले याची माहिती सांगताना अनेकांच्या डोळ्यासमोर युद्धाचे ते थरारक प्रसंग उभे राहिले होते.

बुधवारी (२३ ऑगस्ट) रोटरी हॉलमध्ये सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले माजी सैनिक कॅप्टन रावजी भागुजी घुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. घुले यांच्यासह माजी सैनिक कार्तिक तांगडकर, सखाहरी माळी, सुभाष कातोरे, सुभाष खताळ, काशिनाथ घुले, काशिनाथ खिलारी, रामनाथ हासे, रमेश सातपुते, विजय जोशी, दत्तात्रय नवले, बाजीराव शिंदे, भास्कर सातपुते, नारायण उगले, विजय थोरात आदी उपस्थित होते.

रक्षाबंधन सोहळ्यात घुले यांच्यासह अनेक माजी सैनिकांनी युद्ध धर्मांचे त्यांचे अनुभव कथन केले. युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांच्या तोंडून त्यांचे अनुभव ऐकताना अंगावर अक्षरशः काटा येत होता. रोटरी सदस्य असलेल्या विजय थोरात यांनी देखील आपल्या कारगिल युद्धा दरम्यानचे अनुभव कथन केले. देशासाठी सैनिकांनी आपल्या प्राणाची कशी आहुती दिली आणि युद्धभूमीवर काय केले हे सैनिकाच्या तोंडून ऐकताना अक्षरशः युद्धभूमीचे प्रसंग समोर उभे राहत होते.

रोटरीचे अध्यक्ष साईनाथ साबळे म्हणाले, देशासाठी लढणाऱ्या या सैनिकांचे अनुभव ऐकताना या सैनिकांप्रती उपस्थित असलेल्या सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला होता. या सैनिकांच्या जीवावरच देशातील जनता सुखी व चांगले जीवन जगू शकते. म्हणूनच सैनिकांचे कार्य केवळ तरुणांसाठी नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेसाठी दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.

साबळे यांच्या पत्नी मनोरमा आणि रोटरीचे सचिव विश्वनाथ मालाणी यांच्या पत्नी पुनम, संदीप फटांगरे यांच्या पत्नी प्रतिभा यांनी माजी सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.

रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे, सेक्रेटरी विश्वनाथ मालानी, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, खजिनदार विकास लावरे, माजी एजी दीपक मणियार, माजी अध्यक्ष आनंद हासे, नरेंद्र चांडक, अजित काकडे, डॉ. विकास करंजेकर, डॉ. विनायक नागरे, राजेंद्र खोसे, सुनील घुले, विजय थोरात, संदीप फटांगरे, ऋषिकेश मोंढे, बद्रीनारायण इंदाणी, प्रमोद मणियार, डॉ. किशोर पोखरकर यावेळी उपस्थित होते.

सूत्रसंचालन सुनिल घुले व अजित काकडे यांनी केले. तर विश्वनाथ मालाणी यांनी आभार मानले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 621
रक्षाबंधन संगमनेर रोटरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

June 2, 2026

संगमनेरमध्ये रविवारी ‘संतांचा वारकरी संप्रदाय’ या विषयावर ह.भ.प. विकास लवांडे यांचे व्याख्यान

May 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’…

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.