Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजप आमदार आणि कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल, मृत भावाच्या पत्नीनेच केली तक्रार! काय आहे प्रकार…
गुन्हेगारी

भाजप आमदार आणि कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल, मृत भावाच्या पत्नीनेच केली तक्रार! काय आहे प्रकार…

नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ३१ ऑगस्ट 

नागपूर – भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार फुके यांच्या मृत भावाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार परिणय फुके, फुके यांचे वडील रमेश गोविंदराव फुके (वय ७२), आई रमा (वय ६७), नितीन फुके (वय ४०), पत्नी डॉक्टर परिणीता फुके (वय ४१) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुके यांचे मृत भाऊ संकेत फुके यांची पत्नी प्रिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार संकेत फुके यांना किडनीचा आजार होता. लग्नाच्या वेळी फुके कुटुंबीयांनी ही बाब लपवून ठेवली. आमचे कुटुंब समाजा त नावाजलेले असून राजकीय दबाव आणून आम्ही काहीही करू शकतो, तू शांत बसली नाही तर माणसे पाठवून तुझ्या आई बहिणीवर अत्याचार करवू, अशी धमकी देण्यात आली होती.

सप्टेंबर २०२२ मध्ये संकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी एटीएम, बँक पासबुक, पासवर्डच्या नोंदी, दागिने फुके कुटुंबियांनी हिसकावून घेतले. अताशा आशीर्वाद बिल्डर कंपनीत संकेत याचे ४०% शेअर्स होते ते परस्पर सासूच्या नावावर करण्यात आले.

संकेतच्या मृत्यूनंतर पत्नी प्रिया हिच्या युनियन बँकेच्या खात्यात चार कोटी रुपये आले होते. मात्र त्यातील ३.३० कोटी रुपये खोटी स्वाक्षरी करत रमेश फुके यांच्या खात्यात वळते करण्यात आले होते. बँक व्यवस्थापकाकडूनही या संदर्भात उडवा उडवीची उत्तरे दिली गेली. परीने व नितीन फुके यांनी जबरदस्तीने सह्या घेऊन पारडी येथील प्लॉट देखील विकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कुटुंबीय आणि प्रिया यांच्यात घरगुती वादातून हा प्रकार घडला. भाऊ गेल्यापासून भांडण सुरू होते. मी दुसरीकडे राहतो, वाद मिटविण्याचा खूप प्रयत्न केला. आई-वडिलांनीही तिच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. मी दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न केला. वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील एफ आय आर मध्ये माझे नाव टाकण्यात आल्याने मला धक्का बसला असल्याचे आमदार परिणय फुके यांनी म्हटले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,156
परिणय फुके भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.