Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कृषी उत्पादन वाढीसाठी तरुणांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शेती व सहकार

कृषी उत्पादन वाढीसाठी तरुणांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी येथे शिवार फेरी, कृषी प्रदर्शनाचे आयोजन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/08/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार ३१ ऑगस्ट 

शिर्डी – सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२४ व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार संचालक डॉ. जी. के. ससाणे, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे पाटील आदी उपस्थित होते.

जैविक तंत्रज्ञानाच्या आधारावर पिकविलेला भाजीपाला भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डीत कृषी मालाचे विक्री केंद्र सुरू करता येईल. त्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात येईल. शेतीत जैविक खतांचा वापर वाढत आहे‌. शेतकरी जागृत झाला आहे. शेतात महिलांचा सहभाग वाढला आहे. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी आदर्श असले पाहिजे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम या संस्थांनी करावे.

शेती उत्पादनाबरोबर कृषी पणन बळकट झाले पाहिजे. कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि समूह शेतीचा प्रयोग झाला पाहिजे. शेतकरी प्रयोगशील आहे. त्याला संधी उपलब्ध करून द्यायला हवी. मागील काही वर्षांत भारत सरकारने शेती क्षेत्रात १ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. शेती आता पारंपरिक राहिली नसून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. फवारणीसाठी ड्रोनचा वापर होत आहे‌. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर होत आहे. दूधाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे कल वाढतो आहे. हे पाहता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची गरज आहे. शिवार फेरी, कृषी प्रदर्शनसारख्या उपक्रमातून कृषी संशोधनास चालना मिळणार आहे, असे विखे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विषयक उपक्रम व योजनांची माहिती देणाऱ्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बँकाँक येथे जाऊन बदलत्या कृषी तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण घेतलेल्या ३० विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. राहुरी कृषी विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त तन्मय शिंपी व फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणाऱ्या प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या संघाचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी काढण्यात आलेल्या शिवार फेरीत प्रवरा कृषी शास्त्र संस्था, प्रवरा कृषी महाविद्यालय, प्रवरा जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (खडकेवाके), कृषी तंत्रनिकेतन (लोणी), पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालयाच्या (लोणी, फत्त्याबाद व अळकुटी) विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. परिसरातील शेतकरीही मोठ्या संख्येने शिवार फेरीत सहभागी झाले होते. कृषी प्रदर्शनात राहुरी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व विविध कृषी महाविद्यालयांचे नवीन कृषी तंत्रज्ञानाचे माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. त्याबरोबर स्थानिक विक्रेत्यांचे कृषी माल, यंत्रसामग्री विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविकात डॉ. उत्तमराव कदम यांनी उपक्रमाची माहिती दिली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 624
कृषी प्रदर्शन राधाकृष्ण विखे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar15/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.