Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

सध्या कारखान्याच्या ९,००० मेट्रिक टन क्षमतेच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून यंदाच्या अवघड परिस्थितीतही ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा असलेली साखर कारखानदारी मोठ्या अडचणीत सापडली आहे. अशा कठीण प्रसंगात सरकारने पंचनाम्यांच्या नावाखाली वेळ न घालवता तातडीने निर्णय घेऊन शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, शंकरराव खेमनर, इंद्रजीत थोरात, शरद नाना थोरात, रामहरी कातोरे आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, ऊस उत्पादक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या राज्यात कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून कमी दिवसांत जास्त गाळप करण्यासाठी प्रत्येक कारखान्याने आपली क्षमता वाढवली आहे. मात्र, दुसरीकडे दिवसेंदिवस उसाचे उत्पादन कमी होत चालल्याने कारखान्यांमध्ये उसाची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे संपूर्ण साखर कारखानदारीच संकटात सापडली आहे.
चालू वर्षातील दुष्काळाच्या तीव्रतेवर चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे आणि पाण्याच्या अभावामुळे रब्बी हंगाम होण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पशुधनाची अवस्था बिकट झाली आहे. या परिस्थितीत सरकारने रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावीत आणि चारा छावण्या उभारण्याचा निर्णय घ्यावा. सरकारकडे पैशाचा आव आणला जात असला तरी प्रत्यक्षात जनता उपाशी असून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही पैसे मिळालेले नाहीत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
थोरात कारखान्याच्या वाटचालीविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या कारखान्याने नेहमीच सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगारांचे हित जोपासले आहे. कार्यक्षेत्रातील व बाहेरील सर्व शेतकरी आणि ऊस उत्पादकांचा कारखान्यावर दृढ विश्वास आहे. सध्या कारखान्याच्या ९,००० मेट्रिक टन क्षमतेच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून यंदाच्या अवघड परिस्थितीतही ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, ऑफ सीजन काळात कारखान्याची सर्व डागडुजी आणि विस्तारीकरणाची कामे वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत. कारखान्याने शेतकरी व ऊस उत्पादकांमध्ये अत्यंत विश्वासाचे नाते निर्माण केले असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 50
गळीत हंगाम शुभारंभ थोरात कारखाना बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.