बुधवार, दि. ०४ सप्टेंबर
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबईच्या रिक्त पदी असलेल्या मुख्य अभियंता पदी गेल्या काही दिवसापासून पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र रहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राहणे यांनी नव्या पदाचा पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहे.
राहणे गेल्या काही दिवसापासून नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेरीस त्यांची सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंतापदी मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे.



