Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नासिक-पुणे महामार्गावर जाल तर तुम्हाला आढळेल ठेकेदाराच्या “निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना”! नागरिक आंदोलनाच्या तयारीत…
सामाजिक

नासिक-पुणे महामार्गावर जाल तर तुम्हाला आढळेल ठेकेदाराच्या “निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना”! नागरिक आंदोलनाच्या तयारीत…

पुणे नासिक महामार्गाची पावसामुळे अनेक ठिकाणी दैना
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 26, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रांताधिकारी, तहसीलदारांनीही केली ठेकेदाराची कान उघाडणी, तरीही पडेना फरक

संगमनेर – अनंत पांगारकर

नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथे सध्या महत्त्वाच्या ठिकाणी साईड रस्ते आणि साईड गटारी काढण्यात येत असून ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचा गंभीर आरोप हिवरगाव पठार भागातील नागरिकांनी केला आहे. सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये शिरले आहे. यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंचे व दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कामाकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात महामार्गावरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

साईड गटाराचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या संदर्भात संबंधित काम करणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजरला अनेकदा फोन करून देखील फोन उचलले जात नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांनी या तक्रारीचे गांभीर्याने दखल घेत संबंधितांची कान उघाडणी केली असली तरी अद्याप फारसा फरक पडला नसल्याचे दिसते. पावसामुळे साचणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट संबंधित ठेकेदाराने न लावल्यास परिसरातील ग्रामस्थ आता नासिक पुणे मार्गावर रास्ता रोको आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती हिवरगाव पठारचे सरपंच किरण भागवत यांनी दिली.

भागवत म्हणाले, पावसामुळे गुलाब मोमीन यांच्या हॉटेलमध्ये, घरात मोठ्या प्रमाणात पाणी आणि गाळ साचल्याने घरातील वस्तूंचे आणि हॉटेलमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच साकुर फाट्यावरील रहिवासी बाळासाहेब मदने यांच्या दुकानात देखील पाण्यामुळे अक्षरशः चिखल निर्माण झाल्याने दुकान बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हॉटेल अमरजीत मध्ये देखील कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे.

सध्या सुरू असलेला परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून हवामान खात्याने मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांनी नुकसानग्रस्त घरांचे आणि दुकानांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठ्याला दिले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,047
निकृष्ट काम पुणे नाशिक महामार्ग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगणाऱ्या…

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.