Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत
गुन्हेगारी

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

संगमनेर शहरातील जनता नगर भागात असलेल्या एका घरात आरोपी गांजा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

संगमनेर शहरात अवैध गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगणाऱ्या तीन जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ किलो १३० ग्रॅम सुका गांजा, एक दुचाकी, आयफोन आणि इतर साहित्यासह एकूण २,३४,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

शहर पोलिसांनी रविवारी (२ ऑगस्ट) मध्यरात्री ही कारवाई केली असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील जनता नगर भागात असलेल्या एका घरात आरोपी गांजा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ यांनी तक्रार दिली आहे.

या प्रकरणात संजय उर्फ संदीप राजू मालुंजकर (वय २६, रा. जनता नगर, संगमनेर), आकाश विजय क्षीरसागर (वय २९, हल्ली रा. लक्ष्मीनगर, मूळ रा. जोर्वे, संगमनेर) आणि प्रवीण सखाराम पाचकर (वय २८, हल्ली रा. जनतानगर, मूळ रा. जाखुरी, संगमनेर) या तीन आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून १,०३,२५० रुपये किमतीचा ४,१३० ग्रॅम सुका गांजा, ८० हजार रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी (एमएच १७ डीके ५१२९), ५० हजार रुपये किमतीचा आयफोन १४, १ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कीपॅड मोबाईल तसेच पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, चिकट टेप व स्टेप्लर असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 159
गांजा कारवाई शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगणाऱ्या…

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.