Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समन्यायी पाणी वाटपाचा आरोप करताना तेव्हा तुम्ही कुठे होतात? मंत्रीपद असताना खोट्या केसेस करून लोकांना जेलमध्ये टाकले नाही… माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा विखेंवर हल्लाबोल
शेती व सहकार

समन्यायी पाणी वाटपाचा आरोप करताना तेव्हा तुम्ही कुठे होतात? मंत्रीपद असताना खोट्या केसेस करून लोकांना जेलमध्ये टाकले नाही… माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा विखेंवर हल्लाबोल

गणेश कारखान्याची वार्षिक सभा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २६ सप्टेंबर 

राहाता – माझ्यावर समन्यायीचा आरोप करणारे तेव्हा कुठे होते? मंत्रिमंडळात तुम्हीही होता मग का नाही बोललात? संगमनेरमधून आम्ही भूमिका घेत समन्यायीबद्दल विरोध दर्शविला. महसूलमंत्री असताना आम्ही खोट्या केसेस करून लोकांना जेलमध्ये टाकले नाही. असं स्पष्ट करत गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका, कारण जर आपण ते विसरलो तर पुन्हा सगळं जैसे थे होईल अशी टीका माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर केली.

गणेश सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर पार पडली. यावेळी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते.

व्यासपीठावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे, कृषी भूषण प्रभावतीताई घोगरे, कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, माजी चेअरमन व महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते ॲड. नारायणराव कार्ले, श्रीरामपूर दूध संघाचे अध्यक्ष सुधीर म्हस्के, गंगाधर चौधरी, शिवाजी लहारे, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, विक्रांत दंडवते आदींसह माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, आम्ही येथे चांगले करण्यासाठी आलो आहोत. या भागात असणारे पाणी आणि जनजीवनाशी निगडित समस्या सोडविण्यासाठी जे शक्य असेल ते प्रयत्न आमचे आहेत. गणेश साखर कारखाना अनेक अडचणींवर मात करून पुढे जात आहे. आर्थिक घडी बसविताना संजीवनी आणि संगमनेर यांची मदत असेलच, त्यामुळे येणाऱ्या हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक गाळप करण्यात कारखाना यशस्वी होईल.

मागील गळीत हंगामात राजकीय विरोधकांनी कितीही अडथळे आणले तरीही कारखाना चांगला चालवून दाखवला. यापुढे देखील कारखाना उत्कृष्ट कार्यक्षमतेने चालविला जाईल. कारखान्यासाठी ऊस जास्त कसा वाढेल यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. सर्वांनी जिद्द दाखविली म्हणून मागील गळीत हंगाम यशस्वी पार पडला त्याबद्दल युवा नेते विवेक कोल्हे व संचालक मंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे पण गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका, असे आवाहन त्यांनी केले.

विवेक कोल्हे म्हणाले, गणेश कारखान्याचे जुने साहित्य पूर्वीच्या काळात कसे विकले, याची चौकशी करण्यासाठी तक्रार केलेली आहे. कारखाना जिल्ह्यात सर्वोत्तम चालावा यासाठी प्रयत्नशील आहे. ऊस वाढीसाठी सभासदांनी मोहीम हातात घेऊन जास्तीत जास्त ऊस वाढवला पाहिजे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा घेणारा कारखाना आपण करून दाखवला. कारण सर्वांची जिद्द होती. मागील कालखंडात काय राजकारण झाले हे सर्वांना ठाऊक आहे. कशा अडचणी निर्माण केल्या गेल्या हे सर्वांना ज्ञात आहे.

संस्था नफ्यात येण्यासाठी आपली सामूहिक शक्ती महत्वाची आहे. गणेश परिसरातील काही बंधारे भरले आहेत. मात्र काही अद्याप भरणे बाकी आहे. येत्या काळात त्याकडे आपले लक्ष असणार आहे. कारखाना चांगला चालला पाहिजे, यासाठी विविध माध्यमातून सहाय्य उभे करण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी राजकीय पाठबळ गरजेचे असते. यापुढे जो गणेश कारखानाच्या हिताच्या आड येईल त्याला येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असा इशाराही कोल्हे यांनी दिला.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,093
गणेश कारखाना बाळासाहेब थोरात वार्षिक सभा विवेक कोल्हे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची…

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.