Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सुरू केलेले हे अभियान तालुक्यात एक व्रत म्हणून चालवले जात आहे. - डॉ. सुधीर तांबे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:

ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे. वाढती उष्णता, घटलेला पाऊस, सातत्याने जाणवणारा दुष्काळ आणि पर्यावरणाचा ढासळत चाललेला असमतोल हा मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीसाठी धोक्याची घंटा आहे. हा धोका टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत गरजेचे असून, येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने किमान दोन झाडे लावून त्यांचे प्रामाणिकपणे संवर्धन करावे, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयोजित ‘दंडकारण्य अभियान’ आढावा बैठकीत ते बोलत होते. या कार्यक्रमाला दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, पांडुरंग पाटील घुले, दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, समन्वयक दशरथ वर्पे यांच्यासह वनविभागाच्या अधिकारी श्रीमती हिरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, जगासमोर सध्या ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ही चिंतेची बाब आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हासच या सर्व समस्यांना कारणीभूत आहे. संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण व वृक्ष संवर्धनाची एक नवी संस्कृती रुजली आहे. येथील सहकारी संस्थांनी डोंगरांवर वृक्षारोपण करून ते यशस्वीपणे जगवले आहे. याच धर्तीवर आता प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणात आपले योगदान दिले पाहिजे.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दंडकारण्य अभियानाचा आढावा घेताना सांगितले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सुरू केलेले हे अभियान तालुक्यात एक व्रत म्हणून चालवले जात आहे. यामुळे तालुक्यात मोठी हिरवाई निर्माण झाली. उन्हाळ्यातील पाणीटंचाई व विविध अडचणींवर मात करत कार्यकर्त्यांनी झाडे जगवली आहेत. आगामी काळात अधिक सतर्कतेने हे काम गावोगावी पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

महिलांच्या सहभागाविषयी बोलताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, वृक्ष संवर्धनात महिलांची भूमिका मोठी आहे. महिलांनी आपल्या घरासमोरील परसबागेत आवळा, लिंबू, कढीपत्ता यांसारख्या उपयुक्त वृक्षांची लागवड व जोपासना करावी. तसेच उन्हाळ्यात डोंगरांना लागणारे वणवे ही अत्यंत चिंताजनक बाब असून, त्याबाबत नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पांडुरंग पाटील घुले यांनी प्रास्ताविक केले, तर दशरथ वर्पे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कारखाना कार्यक्षेत्रात १०१ आब्यांच्या वृक्षांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 391
जागतिक पर्यावरण दिन दंडकारण्य अभियान दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात वृक्षारोपण सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराजवळील कोल्हार-घोटी रस्त्यावरील समनापूर फ्लॉवर मार्केट चौफुली येथील…

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.