Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव
यश / निवड / पुरस्कार

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

मुलाखतकार प्रा. अरुण म्हात्रे यांनी डॉ. तांबे यांच्या साधेपणाचे आणि अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/06/2026Updated:05/06/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे: 

जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुणे येथील एका दिमाखदार सोहळ्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार डॉ. तांबे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि पुरोगामी चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात आला.

पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शिका डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोळकर, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश ठाकूर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य, साजदा निहाल अहमद, डॉ. भीमराव आंबेडकर, हेमंत नाईकनवरे, जयवंत पाटील, अजित शिंदे, राजा कांदळकर, अतुल देशमुख, जाकीर अत्तार, अरविंद सावला आणि सुनील यादव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. सुधीर तांबे व त्यांच्या पत्नी दुर्गाताई यांना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रसेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी गौरविले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या प्रकट मुलाखतीत प्रसिद्ध कवी प्रा. अरुण म्हात्रे यांनी डॉ. तांबे यांच्या जीवनप्रवासाचे विविध पैलू उलगडले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या वैचारिक जडणघडणीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, घरात लहानपणापासूनच पुरोगामी वातावरण होते. विद्यार्थीदशेत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरील पुस्तकाने आपल्यावर मोठा प्रभाव टाकला आणि येथूनच वैचारिक परिवर्तनाला सुरुवात झाली. संगमनेरमधील रंगार गल्लीतील वास्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, बी. जे. खताळ पाटील आणि भास्करराव दुर्वे नाना यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहवासातून राजकारणाचे धडे मिळाल्याचे सांगितले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना साने गुरुजी प्रतिष्ठानला दिलेल्या भेटी आणि तेथील वैचारिक चर्चांनी आपल्या विचारांना धार दिली.

संगमनेरमध्ये एम. एस. सर्जन म्हणून उत्तम प्रॅक्टिस सुरू असतानाही, भाऊसाहेब थोरातांचे आदर्श संस्कार, शिस्त आणि प्रामाणिकपणा जपत त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करताना हाच विचार पुढे नेल्याचे सांगत, बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपली विचारधारा सोडली नाही, असा उल्लेख त्यांनी केला. आपण पुरोगामी विचारांचे पक्के कार्यकर्ते असून, लोकशाही आणि राज्यघटनेचा विचार घेऊन तरुणांच्या माध्यमातून विज्ञानवादी समाज घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुलाखतकार प्रा. अरुण म्हात्रे यांनी डॉ. तांबे यांच्या साधेपणाचे आणि अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या राजकारणात राहून सर्वांना बरोबर घेऊन जाणारे डॉ. तांबे यांचे व्यक्तिमत्त्व तरुणांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले.

या वेळी माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ. शैलाताई दाभोळकर आणि माजी आमदार कपिल पाटील यांनीही मनोगते व्यक्त करून डॉ. तांबे यांच्या कार्याचा गौरव केला. या सोहळ्यासाठी हिरालाल पगडाल, अनिकेत घुले, दत्ता ढगे यांच्यासह संगमनेर येथील राष्ट्रसेवा दल, छात्र भारती आणि जयहिंद युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुधीर तांबे यांना हा सर्वोच्च सन्मान मिळाल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, सोमेश्वर दिवटे, नूर मोहम्मद शेख, अजय फटांगरे, निखिल पापडेजा, अर्चनाताई बालोडे, प्रमिलाताई अभंग, विश्वास मुर्तडक यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 385
जयहिंद लोक चळवळ राष्ट्र सेवा दल साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

01/08/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

26/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.