Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजधानीत लोककलेचा ऐतिहासिक गौरव: रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’; संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदोत्सव
यश / निवड / पुरस्कार

राजधानीत लोककलेचा ऐतिहासिक गौरव: रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’; संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदोत्सव

माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांनी केले अभिनंदन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

महाराष्ट्राच्या मातीतील जिवंत लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संगमनेर तालुक्याचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांचा नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेडकर यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते खेडकर यांना पद्मश्री चे वितरण करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

रघुवीर खेडकर यांना मिळालेल्या या बहुमानामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा सन्मान झाला असून, संगमनेरकरांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाचा ठरला आहे, अशा शब्दांत राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रघुवीर खेडकर यांनी पद्मश्री स्वीकारल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध आणि वैभवशाली सांस्कृतिक वारसा रघुभाऊंनी अत्यंत समर्थपणे पुढे चालवला आहे. आजच्या आधुनिक आणि सोशल मीडियाच्या जमान्यात पारंपरिक लोककला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली असताना रघुभाऊंनी या जिवंत लोककलेला पुन्हा एकदा लोकमान्यता मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. महाराष्ट्र तमाशा मालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी तमाशा कलावंतांच्या हक्कासाठी आणि विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी सातत्याने यशस्वी पाठपुरावा केला आहे. त्यांच्या रूपाने तमाशा क्षेत्रातील एका खऱ्या आणि सच्चा कलावंताचा हा राष्ट्रीय गौरव झाला असून संपूर्ण जिल्हा या क्षणाचा अभिमान बाळगत आहे.

याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रघुभाऊंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. रघुभाऊंनी केवळ कलेचीच सेवा केली नाही, तर कलेसोबतच अध्यात्माच्या माध्यमातूनही समाजसेवा केली आहे. आयुष्यभर लोककलेशी प्रामाणिक राहणाऱ्या अशा कलावंताचा सन्मान होणे हा तमाशा क्षेत्राला नवसंजीवनी देणारा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले.

आमदार सत्यजित तांबे यांनी, रघुभाऊंनी तमाशा फड सांभाळताना राज्यातील हजारो कलाकारांची जबाबदारी पालकासारखी स्वीकारल्याचे नमूद केले. या पद्मश्री पुरस्कारामुळे समाजात तमाशा कलावंतांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि त्यांना अधिक मानसन्मान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रघुभाऊंच्या कलेचे वैशिष्ट्य सांगताना माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, त्यांनी महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय केलेले ‘समई नृत्य’ आणि ‘थाळी नृत्य’ आज थेट दिल्ली दरबारी पोहोचले आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला आणि विशेषतः समई नृत्याला संपूर्ण देशाने दिलेली मोठी दाद आहे.

युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी देखील हा क्षण संगमनेर तालुक्याच्या इतिहासातील अत्यंत आनंददायी आणि सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा असल्याचा आनंद व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 630
अमित शहा जयश्री थोरात दुर्गाताई तांबे द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी पद्मश्री पुरस्कार बाळासाहेब थोरात रघुवीर खेडकर सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.