Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतली ‘तुतारी’, भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश… लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या मताधिक्यामागे..! केला मोठा गौप्यस्फोट
राजकारण

अखेर हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतली ‘तुतारी’, भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश… लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या मताधिक्यामागे..! केला मोठा गौप्यस्फोट

इंदापूरमधून उमेदवारीही झाली निश्चित, पारंपरिक लढत रंगणार!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/10/2024Updated:07/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

इंदापूरमधून उमेदवारीही झाली निश्चित, पारंपरिक लढत रंगणार!
सोमवार, ०७ ऑक्टोंबर
काँग्रेस सरकारमधील तत्कालीन माजी मंत्री आणि इंदापुरातील बडे प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी अखेर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतानाच त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आता इंदापूरमधून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार असतील.
इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार आदींच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केला.
प्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरच हर्षवर्धन पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता इंदापूरातून पाटील हे “तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. त्यामुळे इंदापूरात पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी दत्ता भरणे यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांची लढत होईल.
२०२३ च्या जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार यांच्या समावेत जाणाऱ्या चाळीस आमदारांमध्ये इंदापूरचे तत्कालीन आमदार दत्ता भरणे यांचा देखील समावेश होता. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महायुतीत जागा वाटपात ही जागा पवार गटाकडे जाणार असल्यामुळे भाजपकडून निवडणुकीच्या तयारीत असलेल्या हर्षवर्धन पाटलांची मोठी कोंडी झाली होती.
अखेरीस कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार ठाम असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नुकत्याच झालेल्या आणि राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना २५ हजारांचे मताधिक्य होते. याचा धागा पकडत पक्षप्रवेशावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्या आधीच्या तीन निवडणुकांमधील विजयामध्ये आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. परंतु गेल्या निवडणुकीत आमचा सहभाग अदृश्य होता. सुनेत्रा पवार यांचा बारामतीतील पराभव आणि इंदापूरातील सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यामागे कोण होतं ते पाटील यांनी यावेळी सांगून टाकलं.

जयंत पाटील म्हणाले…

आजच्या कार्यक्रमाची गर्दी पुढील विधानसभेचे निकाल सांगून जाते. २०१९चा एक काळ असा होता की, आमच्याकडून एक एक नेता पक्ष सोडून जात होता. त्यावेळी मी राज्यात सर्वत्र सांगत होतो की, जीवनातून जग निर्माण करण्याची ताकत ज्यांच्याकडे आहे ते शरद पवार नावाचे विद्यापीठ आपल्याकडे आहे. एकदा नाही तर चार वेळा त्यांनी सिद्ध करून दाखवल. महाराष्ट्राला लढणारा नेता हवा असतो दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्त केली तेव्हा तेव्हा शरद पवारांनी मराठी स्वाभिमान दाखवून दिला. स्वाभिमानी माणसे आज पवारांच्या मागे आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 833
पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हर्षवर्धन पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व…

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.