Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरला ‘या’ नव्या अधिकाऱ्यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

August 3, 2026

संगमनेर एसटी आगाराला बा विठ्ठल पावला… तब्बल इतक्या लाखांची कमाई

August 3, 2026

सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » या कारणामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा डिसेंबर अखेर स्थगिती, निवडणुका आता पुढील वर्षी
निवडणूक

या कारणामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा डिसेंबर अखेर स्थगिती, निवडणुका आता पुढील वर्षी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही अद्याप निवडणुका नाही
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 8, 2024Updated:October 8, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०७ ऑक्टोबर
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियांना सरकारने पुन्हा स्थगिती दिली आहे. यापूर्वी सरकारने ३० सप्टेंबर पर्यंत या निवडणुकांना स्थगिती दिली होती. आता ही मुदत ३१ डिसेंबर पर्यंत लांबविण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश सोमवारी काढण्यात आले. दरम्यान न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार असल्याने त्यांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.
२०२४-२०२५ या वर्षात राज्यातील २९,४२९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित आहे. त्यापैकी ७,१०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेत सरकारने या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या.
आता या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे कारण देण्यात आले आहे.२०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी तसेच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची सेवा अधिग्रहित केल्यास सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर स्थगित करून ३१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
त्यामुळे गेल्या काही महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दुसऱ्यांदा स्थगिती देण्यात आली आहे. सोमवारी या संदर्भातील आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर पुढील वर्षी होण्याची चिन्हे आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा एकदा सरकारने स्थगिती आणल्याने या निवडणुका लढविणाऱ्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 619
निवडणूक सहकारी संस्था
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

June 17, 2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

May 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अहिल्यानगरला ‘या’ नव्या अधिकाऱ्यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

By अनंत पांगारकरAugust 3, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या…

संगमनेर एसटी आगाराला बा विठ्ठल पावला… तब्बल इतक्या लाखांची कमाई

August 3, 2026

सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 3, 2026

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.