Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?
निवडणूक

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

बिनविरोधाचा मार्ग प्रत्यक्ष निवडणुकीकडे वळतो की शेवटच्या क्षणी पुन्हा राजकीय समझोता होतो, याकडे आता सहकार क्षेत्रासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधाचा फॉर्म्युला राबविण्याच्या हालचाली सुरू असताना संगमनेर आणि राहाता तालुक्यातील घडामोडींनी या निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत विरोधी उमेदवारांच्या सूचकांनी केलेली सही आपली नसल्याचे इन कॅमेरा निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले आहे. यामुळे या दोन्ही जागा आता बिनविरोधच्या मार्गावर आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय चर्चेला सुरुवात झाली होती. थोरात आणि सुजय विखे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी सहकार क्षेत्रातील ही निवडणूक टाळण्यासाठी एकमताचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना धक्का बसला असला तरी सुरुवातीच्या टप्प्यातच अनेक जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.

याच पार्श्वभूमीवर संगमनेर आणि राहाता तालुक्यातील सूचकांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संबंधित उमेदवारी अर्जांमध्ये सूचक म्हणून सही करण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या पेचामुळे काही उमेदवारांचे राजकीय गणित अडचणीत आले आहे. हा केवळ कागदोपत्री अडथळा नसून त्यामागे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे दडलेली असल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू झाली आहे. थोरात-विखे यांचा अहिल्यानगर जिल्ह्यावर मोठा प्रभाव आहे.

विशेष म्हणजे, संगमनेर तालुका हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक प्रभावी तालुक्यांपैकी एक आहे. सोसायटी, बिगरशेती आणि शेतीपूरक या प्रमुख मतदारसंघांत संगमनेरचे मोठे संख्याबळ असल्याने येथील प्रत्येक निर्णयाचा जिल्हास्तरीय निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संगमनेरमध्ये कोणाच्या बाजूने किती मतांचे ध्रुवीकरण होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे राहाता तालुकाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय प्रभावामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा मानला जातो. संगमनेर आणि राहाता या दोन तालुक्यांतील घडामोडींचा परिणाम सुजय विखे आणि रणजीतसिंह देशमुख यांच्या संभाव्य राजकीय समीकरणांवर होणार आहे.

दरम्यान, रणजीतसिंह देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चित्रा गायकवाड यांच्या सूचकांनी उमेदवारी अर्जावर केलेली सही आपली नसल्याचे, तसेच डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकनाथ घोगरे यांच्या सूचकाने अर्जावरील सही आपली नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले असून निवडणुकीतील चुरस वाढली आहे. त्यामुळे बिनविरोधाचा मार्ग प्रत्यक्ष निवडणुकीकडे वळतो की शेवटच्या क्षणी पुन्हा राजकीय समझोता होतो, याकडे आता सहकार क्षेत्रासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 294
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक बाळासाहेब थोरात रणजीतसिंह देशमुख राधाकृष्ण विखे सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधाचा फॉर्म्युला राबविण्याच्या हालचाली सुरू…

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.