Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हॉस्पिटल संलग्न मेडिकल चालकांकडून रुग्णांची आर्थिक लूट, सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी… नाहीतर करणार आंदोलन; शहर संघटक रवींद्र कानकाटे
आरोग्य

हॉस्पिटल संलग्न मेडिकल चालकांकडून रुग्णांची आर्थिक लूट, सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी… नाहीतर करणार आंदोलन; शहर संघटक रवींद्र कानकाटे

औषध प्रशासनाकडेदेखील केली मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2024Updated:08/10/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ८ ऑक्टोबर 

संगमनेरमध्ये बहुतांशी रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध दुकानांमधून (medical Store) औषध घेण्याची सक्ती रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांना केली जाते. या औषध दुकानातून छापील किमतीवर औषधांची विक्री केली जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या उलट रुग्णालयाशी संलग्न नसलेल्या अनेक औषधांच्या दुकानातून औषधांवर दहा ते पंचवीस ते टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने अशा प्रकारची सवलत सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानातून देण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेर शहर संघटक तथा युवा सेना उपजिल्हा समन्वयक रवींद्र कानकाटे यांनी केली आहे.

रुग्णालयांशी संघटना असलेल्या औषध विक्रेत्यांनी अशा प्रकारची सवलत रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिली गेली नाही तर शिवसेना या प्रश्नावर मोठे जन आंदोलन उभे करेल, असा देखील इशारा कानकाटे यांनी दिला आहे. रुग्णालयाशी संलग्न नसलेले औषध विक्रेते ही सवलत देऊ शकतात तर हजारो लाखो रुपयांची बिले करणाऱ्या रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध दुकानांना हे सहज शक्य असल्याने त्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

आधीच सरकारी रुग्णालयांची वानवा असलेल्या संगमनेरमध्ये खासगी रुग्णालयांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. नवीन नगर रस्त्यासह शहराच्या बहुतांशी भागात आता मोठमोठाली रुग्णालये उभी राहिली आहे. रुग्णालयाशी संलग्न असलेल्या या औषध दुकानांमधून औषध घेण्याची अप्रत्यक्ष सक्ती असल्याने खाजगी औषध दुकानांच्या तुलनेत रुग्णांचा खिसा मोठ्या प्रमाणात कापला जात असल्याचे समोर आहे येत आहे.

सरकारी रुग्णालय नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयाची पायरी चढावी लागते. त्यामुळे आधीच कोणत्याही शासकीय उपचार योजनेचा लाभ घेण्यापूर्वीच रुग्णांचा रुग्णाच्या नातेवाईकांचा खिसा कापला जातो. हजारो लाखो रुपयांची बिल रुग्णांच्या माथी मारली जातात. संगमनेरातील बहुतांशी रुग्णालय आर्थिक बाबतीत ‘कत्तलखाने’ म्हणून ओळखले जातात. जवळपास सर्वच बड्या रुग्णालयांमध्ये औषध दुकाने उपलब्ध आहेत.

रुग्ण उपचारासाठी दाखल होतात थेट ऑनलाइन पद्धतीने या औषध दुकानांमध्ये डॉक्टर अथवा त्यांच्या स्टाफकडून ऑनलाइन पद्धतीने औषधांची चिठ्ठी पाठविली जाते. आणि रुग्णाला संबंधित औषध दुकानातून औषध आणण्यास सांगितली जातात. त्यामुळे औषध दुकानातून घेतलेली औषध आपल्याच रुग्णाला वापरली जातात का? याबाबत साशंकता असताना मोठ्या प्रमाणात औषधांची बिल रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना द्यावी लागतात.

चार -पाच दिवसांसाठी रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात ॲडमिट असला, छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तरी प्रत्यक्षात हजारो, लाखो रुपयांमध्ये त्याला औषधांसह रुग्णालयाची बिल भरावी लागतात. अशा परिस्थितीत त शहरातील रुग्णालयाशी संलग्न नसलेल्या औषध दुकानदारांकडून औषध घेतल्यास मोठ्या प्रमाणात त्यांना बिलामध्ये सवलत मिळत असते. थोड्या फार प्रमाणात बिलाची रक्कम असेल तर याचा फारसा विचार न करता हे बिल दिली जातात, मोठ्या प्रमाणात औषधाचे बिल होत असल्याने ही सवलत या रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानातून दिली जावी. यातून रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांचे हजारो रुपये वाचतील आणि आजारपणात त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल.

औषध निरीक्षकांकडे (Drug Inspector) देखील केली मागणी…

शहरातील खासगी औषध विक्रेत्यांप्रमाणे रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध विक्रेत्यांनी देखील सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना औषधांच्या बिलामध्ये सवलत द्यावी. यामुळे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळेल यासाठी अहमदनगरचे औषध निरीक्षक हेमंत मेटकर यांच्याकडे देखील यासंबंधीची तक्रार करण्यात आली आहे. – रवींद्र कानकाटे, शिवसेना (उबाठा) शहर संघटक तथा युवा सेना उपजिल्हा समन्वयक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 18,157
औषध दुकाने रवींद्र कानकाटे रुग्णालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.