Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संगमनेर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता, शहर स्वच्छतेस लागणार हातभार!
महाराष्ट्र संवाद विशेष

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संगमनेर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता, शहर स्वच्छतेस लागणार हातभार!

सरकारने सुमारे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ०९ ऑक्टोंबर

संगमनेर : संगमनेर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातून सांडपाणी स्वच्छता ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्यावर प्रक्रिया याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन नगर परिषदेला करता येईल. या प्रस्तावास नुकतीच मान्यता मिळाल्याने संगमनेर शहर स्वच्छतेस अधिक हातभार लागणार आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी सरकारने सुमारे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मंत्रालय पातळीवर पाठपुरावा केला होता.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे राज्यातील सर्व शहरे कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट असून या अंतर्गत शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे या बाबी अंतर्भूत आहेत. प्रकल्पासाठी लागणारा निधी राज्य व केंद्र सरकार मिळून देत आहे.

संगमनेर नगर परिषदेतही हा प्रकल्प राबवला जावा यासाठी पालिकेने शासनाला प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास मागील महिन्यात मान्यता मिळाली परंतु प्रशासकीय मान्यता प्रलंबित होती. त्यास आता प्रशासकीय मान्यताही मिळाल्याने स्वच्छ संगमनेर शहराचा मार्ग मोकळा झाला आहे.

ओला कचरा व्यवस्थापनासाठी ०१ कोटी १७ लक्ष रुपये, सुका कचरा व्यवस्थापनासाठी २५ लाख आणि या कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापनासाठी ५१ लाख ४६ हजार असा सुमारे एकूण ०१ कोटी ९३ लाखाच्या निधीतून हा प्रकल्प साकारला जाईल. यात केंद्राचा हिस्सा ९६ लाख ५३ हजार तर राज्याचा हिस्सा ७७ लाख २२ हजाराचा असणार आहे. याशिवाय पालिकेने स्वनिधीतून सुमारे वीस लाखाची रक्कम यात टाकायची आहे.

प्रकल्पासाठी नगरपरिषदेने तात्काळ ई निविदा प्रक्रिया राबवायची आहे. आगामी निवडणुकांची शक्यता लक्षात घेता खर्चामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि मान्यतेशिवाय अधिकचा निधी लागल्यास त्याची जबाबदारी नगरपालिकेने घ्यावयाची आहे, असेही मंजुरी आदेशात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 618
घनकचरा व्यवस्थापन शासन निर्णय संगमनेर नगर परिषद स्वच्छ महाराष्ट्र अभियान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.