Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन, परिसरातील धार्मिक पर्यटन, आर्थिक विकासाला चालना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
राजकारण

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन, परिसरातील धार्मिक पर्यटन, आर्थिक विकासाला चालना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसही दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ०९ ऑक्टोंबर

शिर्डी – शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. शिर्डी विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी व परिसरातील धार्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केले.

शिर्डी विमानतळ येथील कार्यक्रमाप्रसंगी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, शिर्डी विमानतळ संचालक गौरव उपश्याम उपस्थित होते.

मोदी म्हणाले, शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे साईबाबांच्या भक्तांना सुविधा मिळणार आहेत. यामुळे शिर्डी, शनिशिंगणापूर व आजूबाजूच्या परिसरातील भक्तांच्या संख्येत वाढ होऊन राज्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. कार्गो कॉम्प्लेक्समुळे शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर व नाशिक परिसरातील कांदा, द्राक्ष, शेवगा, पेरू व डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचा कृषी माल देश – विदेशात निर्यात होईल.

रायगड येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाचे नेहमीच सहाय्य राहिले आहे. शिर्डीला श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. साईबाबा भक्तांच्या सेवेसाठी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत साकारत आहे. या इमारतीची अंदाजित किंमत ६४५ कोटी रूपये आहे. यामुळे शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. ५५ कोटी खर्चून शिर्डी विमानतळावर कार्गो सेवा उभारली जात आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅंडिंग सुविधा सुरू होणार आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी शहर जगाच्या नकाशावर येणार आहे. येत्या काळात येथे येणाऱ्या साईभक्तांमुळे शिर्डी हे भारतातील सर्वांत जास्त प्रवाशांनी गजबजलेले विमानतळ ठरणार आहे.

यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शिर्डी विमानतळ हे संपूर्ण जिल्ह्याचे आर्थिक विकासाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपाला येणार आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळामुळे शिर्डी एमआयडीसीतील उद्योगांना चालना मिळणार आहे. आजपासून शिर्डी विमानतळाचे नाव ‘साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे नामकरण करण्यात आले आहे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 779
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी राधाकृष्ण विखे शिर्डी विमानतळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.