Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या राजापूरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शाहीर विठ्ठल उमप यांचे नाव, जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर
प्रशासन

संगमनेरच्या राजापूरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शाहीर विठ्ठल उमप यांचे नाव, जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर

राजापूर आयटीआयचे 'शाहीर विठ्ठल उमप' असे नामांतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, ११ ऑक्टोंबर 

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर करण्यात आले असून शुक्रवारी राजापूर आयटीआयचे ‘शाहीर विठ्ठल उमप’ असे नामांतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

राजापूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राजापूर येथे प्राचार्य यु. डी.पालवे, शाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप, जिल्ह्यातील सर्व आयटीआयचे प्राचार्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

विखे म्हणाले, राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी आयटीआय कार्यरत आहेत‌. यापैकी १०८ आयटीआयना त्या जिल्ह्यातील थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांची नावे देण्यात येत आहेत‌. आयटीआयचे नामांतर ही ऐतिहासिक घटना आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजनांच्या माध्यमातून तरूणांना रोजगाराबरोबर कुशल करण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना करावे लागणार आहे. काळानुरूप तंत्रज्ञानात बदल होत असून आयटीआयनी ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ अधिकाधिक वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले.

शाहीर विठ्ठल उमप यांनी त्यांच्या शाहीरीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव साता समुद्रापार उंचावले. शाहीर उमप यांच्या लौकीकाला साजेसे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे चिकनी (संगमनेर) येथे शाहीर विठ्ठल उमप यांचे स्मारक साकार झाल्याचे संदेश उमप यावेळी म्हणाले.

या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात झाला बदल…

अहिल्यानगर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कै. माणिकराव नरसिंगराव पाटील, श्रीगोंदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री संत शेख महंमद महाराज, कर्जत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री संत शिरोमणी गोदड महाराज, शेवगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्वातंत्रसेनानी पद्मभूषण बाळासाहेब भारदे, श्रीरामपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्व. जयंतराव ससाणे, कोपरगाव श्रीरामपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्व. सूर्यभान पाटील वहाडणे, राहाता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, मवेशी (ता. अकोले) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डॉ. गोविंद गारे, केळी कोतुळ (ता.अकोले) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक, अकोले व राजूर (ता.अकोले) या दोन्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे क्रांतिकारक राघोजी भांगरे, पारनेर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सेनापती बापट, नेवासा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संत ज्ञानेश्वर महाराज, पाथर्डी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे असे नामांतर करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 848
आयटीआय नामांतर राधाकृष्ण विखे विठ्ठल उमप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.