Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यातील अनाधिकृत जाहिरात फलक तातडीने काढा, अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश… हे आहे कारण!
प्रशासन

जिल्ह्यातील अनाधिकृत जाहिरात फलक तातडीने काढा, अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश… हे आहे कारण!

जिल्ह्यात फ्लेक्स बंदी कागदावर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १२ ऑक्टोंबर 

अहिल्यानगर – उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर्स आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करत ते तातडीने काढून टाकण्याचे निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते.

तर दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241011-WA0084-1.mp4

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत व ग्रामपंचायत हद्दीत याबाबत तातडीने कार्यवाही करावी.

न्यायालयाच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन होईल यादृष्टीने संबंधित विभागांनी लक्ष द्यावे. या कामासाठी पोलीस विभागाने आवश्यक ते मनुष्यबळ पुरविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या.  जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश प्रशासन गांभीर्याने घेणार का?

न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने अनधिकृत जाहिरात फलक काढण्याच्या आदेश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले असले तरी जिल्ह्यात सर्वत्र राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करत विनापरवानगी जाहिरात फलक लावले जातात. हे जाहिरात फलक हटविण्याचे धाडस संबंधित अधिकारी दाखवत नसल्याने जिल्ह्यात सर्वत्र फ्लेक्सचा बाजार भरला आहे. संबंधित अधिकारी आता तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करतील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे?

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 686
फ्लेक्स बंदी सिद्धाराम सालीमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.