Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात प्लास्टिक बंदीची कारवाई किरकोळ विक्रेत्यांवर, कारवाई करणारे पथकही वादाच्या भोवऱ्यात सीओ साहेब, प्लास्टिक पुरविणाऱ्यावर कारवाई करा – दीपक साळुंके
सामाजिक

संगमनेरात प्लास्टिक बंदीची कारवाई किरकोळ विक्रेत्यांवर, कारवाई करणारे पथकही वादाच्या भोवऱ्यात सीओ साहेब, प्लास्टिक पुरविणाऱ्यावर कारवाई करा – दीपक साळुंके

ओळखपत्रविना कारवाईसाठी फिरतात कर्मचारी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/10/2024Updated:16/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, १५ ऑक्टोंबर 

संगमनेर नगर परिषदेकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी असताना देखील शहराच्या विविध भागात, नवीन नगर रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांवर प्लास्टिक बंदीची कारवाई करणारे पथक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारवाई करणाऱ्या माणसांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र अथवा कारवाईसाठी प्राधिकृत केल्याचे पत्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या नावावर कारवाई करणारे हे कर्मचारी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मंगळवारी दुपारी नवीन नगर रस्त्यावर काही फळ विक्रेत्यांकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करत ते जप्त करण्याचे काम दोन-तीन तरुण करत होते. या कर्मचाऱ्यांना पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी याबाबत विचारणा केली असता, तुम्ही नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांशी बोला. त्यांनी आम्हाला कारवाईसाठी पाठवले, अशा शब्दात उत्तरे दिली.

या तरुणांकडे कारवाईदरम्यान कोणताही गणवेश, ओळखपत्र अथवा मुख्याधिकाऱ्यांचे पत्र नव्हते. त्यामुळे या संदर्भात विचारणा केली असता मुख्याधिकाऱ्यांना बोलावून घेतो, त्यांच्याशी बोला अशी भाषा वापरत वाद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान या ठिकाणी आलेल्या पालिकेतील एका कर्मचाऱ्यांने वाद घालणाऱ्या संबंधित तरुणांना शांत केले. संबंधित तरुण हे कोणाशीही परिचित नसल्याने ते नेमके कोण याबाबत विचारणा केली असता त्यातील एकाने मी आदर्श सर्विसेसचा कर्मचारी आहे अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितली. त्याच्याकडे देखील कोणतेही ओळखपत्र नव्हते. तसेच एक जण पालिकेत नव्यानेच बदलून आले असून त्यांच्याकडे देखील कोणतेही ओळखपत्र नसल्याने संभ्रम निर्माण झाला.

त्यामुळे नगरपालिकेकडे पुरेसे कर्मचारी उपलब्ध असताना मुख्याधिकाऱ्यांना शहराचा कचरा उचलण्याचा ठेका दिलेल्या कंपनीच्या कामगारांची मदत का घ्यावी लागली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आत्तापर्यंत नेमक्या किती लोकांवर पालिकेने कारवाया केल्या? किती प्लास्टिक पकडले? यात प्लास्टिक विक्रेते किती असे देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.

प्लास्टिक विक्रेत्यांना सोडून किरकोळ भाजीपाला, फळ विक्रेत्यांवर कारवाई कशासाठी….

प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी याच्याशी आम्ही सहमत असून शहरातील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या किरकोळ भाजीपाला, फळ विक्रेत्यांकडे प्लास्टिक येते कुठून, याचा शोध घेऊन संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अशा मोठ्या विक्रेत्यांवर छापेमारी करून कारवाई करायला हवी. किरकोळ विक्रेत्यांकडून किरकोळ प्रमाणात प्लास्टिक पिशव्या हस्तगत करून शहरात या प्लास्टिक बंदी नियमाची प्रभावी अंमलबजावणी होणार नाही. मोठे मासे सोडून किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा कशासाठी? मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःहून कारवाया केल्या तर शहरात प्लास्टिकच्या वापराला कोणाचे आशीर्वाद आहे, हे देखील समोर येईल. – दीपक साळुंके, सदस्य पथविक्रेता समिती, संगमनेर.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 13,181
दीपक साळुंके प्लास्टिक पिशवी कारवाई प्लास्टिक बंदी रामदास कोकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.