Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर आणि अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात खर्चाच्यादृष्टीने संवेदनशील
निवडणूक

संगमनेर आणि अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात खर्चाच्यादृष्टीने संवेदनशील

सहा महिन्यांत त्या मतदारसंघातून चलनाच्या मागणीत २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचा भारतीय रिझर्व बँकेचा अहवाल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2024Updated:17/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, १७ ऑक्टोबर 

अहिल्यानगर – निवडणूक आयोगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व अहिल्यानगर शहर हे दोन विधानसभा मतदारसंघ “खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील” ठरविले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त पथके तैनात केली जाणार आहेत. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली.

गत विधानसभा निवडणुकीत तत्कालीन अहमदनगर आणि सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील ठरवला गेला होता. यावेळी मात्र संगमनेरसह अहिल्यानगर शहर मतदारसंघाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणजे काय? 

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये तेलंगणा, राजस्थान, मिझोराम, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी वेळी खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ ही संकल्पना राबविली होती. त्यानंतर लोकसभेतही ही संकल्पना राबविली गेली. केवळ मतदारसंघच नव्हे तर मतदारसंघामधील खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील भागांचा शोधही घेण्यास आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

आयोगाने त्यासाठी विविध निकष ठरवून दिले आहेत. ज्या ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघाच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये पैसे वाटप, दारू वाटप, अंमली पदार्थ व्यवसाय, गैरप्रकार, भ्रष्ट मार्गाचा अवलंब याच्या तक्रारी झाल्या, गुन्हे दाखल झाले, त्या मतदारसंघाचा पूर्वइतिहास पोलिसांसह विविध अंमलबजावणी संचालनालयाचे अहवाल यानुसार हे खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ निवडले गेले आहेत. 

याशिवाय निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच्या सहा महिन्यांत त्या मतदारसंघातून चलनाच्या मागणीत २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचा भारतीय रिझर्व बँकेचा अहवाल, काही मोजक्या खात्यातून प्रचंड मोठ्या संख्येच्या खात्यांमध्ये जमा होणाऱ्या रकमा, गेल्या सहा महिन्यात वाढलेले ऑनलाइन व डिजिटल पेमेंट, अशा विविध निकषानुसार खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ निवडले गेले आहेत.

निवडणूक निरीक्षकांवर जबाबदारी…

खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघांवर नजर ठेवण्यासाठी इतर मतदारसंघांपेक्षा अतिरिक्त पथके नियुक्त केली जाणार आहेत. याबरोबरच खर्चविषयक निवडणूक निरीक्षकांनी मतदारसंघाला भेट देताना तेथील विविध भागही शोधायचे आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 690
आचारसंहिता निवडणूक राहुल पाटील विधानसभा निवडणूक संवेदनशील मतदारसंघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

17/06/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.