Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय
निवडणूक

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी अत्यंत संयमी भूमिका मांडत हा विजय दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बारामती:

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ मतांच्या विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत त्यांना एकूण २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या २२ उमेदवारांसह ‘नोटा’ला केवळ ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत प्रस्थापित केलेला १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडीत काढला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र २२ अपक्ष उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली.

मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला होता, सुमारे ५८.२७ टक्के मतदान झाले. बारामतीतील एमआयडीसी भागात पार पडलेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. टपाली मतपत्रिकांपासून सुरू झालेली ही आघाडी प्रत्येक फेरीगणिक वाढत गेली आणि २४ व्या फेरीअखेर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात नव्हते, परंतु करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांना मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी अत्यंत संयमी भूमिका मांडत हा विजय दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित केला. निकाल जाहीर होताना त्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा जल्लोष न करण्याचे, मिरवणुका न काढण्याचे आणि गुलाल न उधळण्याचे भावनिक आवाहन केले. दादांच्या आठवणींमुळे सर्वजण भावूक असल्याचे नमूद करत, त्यांच्या विचारांना साजेसे वर्तन राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. बारामतीकरांनी दाखवलेला हा विश्वास अजितदादांच्या कार्याप्रती असलेली श्रद्धा असल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 627
पोटनिवडणूक सुनेत्रा पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

16/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.