Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष
निवडणूक

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

संस्थेच्या विद्यमान कारभाराविषयी, निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल आणि नेतृत्वशैलीबाबत काही सभासदांमध्ये छुपी नाराजी असल्याचे या मतदानातून स्पष्टपणे समोर आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर :
संगमनेर येथील नामांकित शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने आपले वर्चस्व राखत विजय संपादन केला आहे. मात्र, ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होईल हा अंदाज फोल ठरवत, एकमेव उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या ॲड. संग्राम जोंधळे यांनी सत्ताधारी पॅनलला जोरदार टक्कर दिली. कोणतीही यंत्रणा किंवा संपूर्ण विरोधी पॅनल पाठीशी नसताना केवळ वैयक्तिक पातळीवर लढून ॲड. जोंधळे यांनी तब्बल ११२ मते खेचून आणल्याने, सध्या संगमनेरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांच्याच धाडसी लढतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक मंडळाच्या एकूण जागांसाठी तब्बल ३१ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ३० उमेदवार हे संजय मालपाणी यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत पॅनलचे होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रयत्न झाले, परंतु ॲड. संग्राम जोंधळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणुकीच्या मैदानात ठाम राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेमुळे संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता हुकली आणि मतदान प्रक्रिया पार पडली.
संस्थेच्या मतदानाच्या दिवशी एकूण ५१९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण पॅनल विरुद्ध एकटा उमेदवार अशा या असमान आणि अत्यंत चुरशीच्या लढतीत ॲड. जोंधळे यांनी सत्ताधाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे केले. मतमोजणीअंती मालपाणी पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला असला, तरी ॲड. संग्राम जोंधळे यांना मिळालेली ११२ मते सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत. संपूर्ण बलाढ्य पॅनल आणि त्यांच्या यंत्रणेच्या विरोधात एकाकी लढत देत मिळवलेला हा आकडा राजकीय जाणकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या निवडणुकीच्या निकालानंतर मालपाणी पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष करत विजयाचे स्वागत केले. परंतु, त्याच वेळी ॲड. जोंधळे यांना मिळालेल्या मतटक्क्यामुळे संस्थेच्या अंतर्गत कारभारावर पडदा पडू शकलेला नाही. संस्थेच्या विद्यमान कारभाराविषयी, निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल आणि नेतृत्वशैलीबाबत काही सभासदांमध्ये छुपी नाराजी असल्याचे या मतदानातून स्पष्टपणे समोर आले आहे. ही नाराजीच मतांच्या रूपाने ॲड. जोंधळे यांच्या पारड्यात पडल्याचे मत काही ज्येष्ठ सभासदांकडून व्यक्त केले जात आहे.
निवडणूक निकाल समोर आल्यानंतर सर्वाधिक मतांनी डॉ. संजय मालपाणी निवडून आले असले तरी एकमेव उमेदवार म्हणून निवडणूक लढवूनही ॲड. संग्राम जोंधळे यांनी मिळविलेला हा पाठिंबा लक्षणीय असून, त्यांनी सत्ताधाऱ्यांसमोर निर्माण केलेले आव्हान भविष्यातील बदलांचे संकेत देणारे मानले जात आहे. या निकालामुळे संस्थेच्या आगामी काळातील राजकारणात आणि निर्णयप्रक्रियेत ॲड. जोंधळे यांची भूमिका अधिक महत्त्वाची आणि वजनदार ठरणार हे मात्र निश्चित झाले असून, शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात यावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत विजय झालेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत….
आट्टल ओंकार रामदयाळ (४८५)
करवा संतोष मोहनलाल (४७२)
कालडा गिरिश राधाकिसन (४६५)
कासट अरविंद गंगाबिसन (४८२)
चोथवे संदिप दत्तात्रय (४५३)
चांडक नरेंद्र बद्रिनारायण (४८६)
जाजु दिपक श्रीनिवास (४४९)
जोंधळे ॲड. संग्राम माधव (११२ पराभूत) 
डंग जसपाल सिताराम (४७९)
डंग महेश बिहारीलाल (४८३)
ताजणे अरुण लहाणू (४७२)
थोरात किसन केशवराव (४५०)
देशमाने बाळासाहेब भास्करराव (४५५)
नावंदर मधुसुदन सुभाषचंद्र (४६४)
नावंदर श्रीहरी अरुणकुमार (४५९)
पलोड सचिन लक्ष्मीनारायण (४६७)
पवार रवींद्र रत्नाकर (४७०)
पारख नंदलाल बन्सीलाल (४६५)
पंडीत सात्विक अमित (४६८)
बाफणा ऋषीकेश नंदनमल (४६२)
भुतडा ॲड.राजेश जगदीश (४८३)
मणियार अनिश कमलकिशोर (४६२)
मालपाणी संजय ओंकारनाथ (४९०)
राठी अनिल पन्नालाल (४८०)
राठी केदारनाथ चंपालाल (४७५)
लढ्ढा डॉ. राजेंद्र शंकरलाल (४७४)
लाहोटी गणेश शिवप्रसाद (४८४)
शाह आशिष अरविंद (४६३)
सराफ डॉ. पराग प्रकाश (४७३)
सातपुते अनिल जगन्नाथ (४७९)
सोमाणी कैलास श्रीनिवास (४८२)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,321
निवडणूक शिक्षण प्रसारक संस्था
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.