Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपालिका प्रशासकांना शहर काँग्रेसने दिले ‘यासाठी’ निवेदन…
सामाजिक

संगमनेर नगरपालिका प्रशासकांना शहर काँग्रेसने दिले ‘यासाठी’ निवेदन…

घनकचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट सुरु करणे, पार्किंग व्यवस्था, खड्डे बुजवण्याची मागणी आदींचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १९ ऑक्टोबर 

संगमनेर – संगमनेरची बाजारपेठ हे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी नगर परिषदेने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

खरेदीच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची व्यवस्था व्हावी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन व्हावे, शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे तसेच शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुरू असाव्यात आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. दिवटे यांच्यासह माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, नूर मोहम्मद शेख, राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, अंबादास आडेप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

शुक्रवारी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे वैभवशाली शहर म्हणून ओळखले जात आहे. तालुक्याची आर्थिक व्यवस्था मजबूत असल्याने दिवाळीच्या काळात शहरांमध्ये शेकडो कोटींची उलाढाल होत असते. याचबरोबर संगमनेर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील अनेक नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने संगमनेर शहरात येतात.

त्यामुळे या सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. सणासुदीच्या काळातील स्वच्छतेकरता घनकचरा व्यवस्थापन व्हावे, सर्व रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट सुरु कराव्यात, विविध रस्त्यांवर असलेले खड्डे तात्काळ बुजवावेत, तसेच आलेल्या सर्व नागरिकांना पार्किंगची चांगली सुविधा व्हावी आदी नागरी समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी शहर काँग्रेसचे निवेदन स्वीकारले. यावेळी प्रास्ताविक शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 751
निवेदन रामदास कोकरे शहर काँग्रेस सोमेश्वर दिवटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- उडीसा आणि आसाम या राज्यांतून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी…

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.