Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आदर्श आचारसंहितेतही खासदारांच्या संपर्क कार्यालयाचा नामफलक जैसे थे!
निवडणूक

आदर्श आचारसंहितेतही खासदारांच्या संपर्क कार्यालयाचा नामफलक जैसे थे!

समोर दिसत असताना देखील आदर्श आचारसंहितेकडे दुर्लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १९ ऑक्टोबर 

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे कठोरपणे पालन केले जात असल्याचे भासविले जात असल्याचे समोर आले आहे. संगमनेर बस स्थानकाच्या गाळ्यात शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदारांचे संपर्क कार्यालय असून या संपर्क कार्यालयाचा नामफलक मात्र आचारसंहितेतून वगळला गेला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यासह संगमनेर मतदार संघात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. राजकीय पक्षांचे फलक आचारसंहिता लागू होतात तातडीने काढण्यात आले असले तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचा नामफलक मात्र अद्यापही दर्शनी भागावर आहे त्या स्थितीत आहे.

हा नामफलक अर्धवट झाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. विशेष म्हणजे याच चौकातून निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांची ये-जा असते. बस स्थानकाच्या गाळ्यात असलेला आणि लक्ष वेधून घेणार हा फलक अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याच्या निदर्शनास आल्याचे दिसत नाही.

शनिवारी संध्याकाळी वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत हा नाम फलक छायाचित्रात असलेल्या स्थितीत कायम होता. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे कठोरपणे मतदारसंघात पालन केले जात असल्याचे भासविले जात आहे का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.

शहरातील राजकीय पक्षांचे फ्लेक्स बोर्ड, बॅनर पाठविण्यात आले असले तरी संपर्क कार्यालयावरील फलक मात्र अद्यापही उघडाच असल्याने या मतदारसंघात विशेषतः सातत्याने गजबजलेल्या बस स्थानक चौकात किती गांभीर्याने पालन होते हे देखील या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 824
आचारसंहिता भंग आदर्श आचारसंहिता भाऊसाहेब वाकचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!

17/06/2026

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

15/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.