Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकोलेतून अजितदादांचा उमेदवार ठरला… विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना दिला एबी फॉर्म!
निवडणूक

अकोलेतून अजितदादांचा उमेदवार ठरला… विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना दिला एबी फॉर्म!

महाविकास आघाडीच्या उमेदवाराची प्रतीक्षा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २२ ऑक्टोबर 

मुंबई – भारतीय जनता पक्षाने आपली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना एबी फॉर्म चे वाटप केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातून अकोले मतदार संघात विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना एबी फॉर्म दिल्याने ते महायुतीचे या मतदारसंघातील उमेदवार असतील.

अकोले मतदार संघाची जागा डॉ. किरण लहामटे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे राहिली आहे. लहामटे यांना एबी फॉर्म मिळाल्याने महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवार गटाकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविणारे वैभव पिचड हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने ते आणि अन्य इच्छुक काय निर्णय घेतात यावर पुढील गणिते अवलंबून आहे.

अजित पवार गटाकडे ही जागा गेल्याने डॉ. किरण लहामटे यांच्यासमोर आता महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार असण्याची दाट चिन्ह निर्माण झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढविण्यास मतदार संघातील अनेक इच्छुक मैदानात उतरले असून त्या दृष्टीने तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी पवारांची गाठभेट देखील घेतल्याचे वृत्त आहे.

महाविकास आघाडीचा उमेदवार ठरविताना आमदार बाळासाहेब थोरात यांची भूमिका ठरणार निर्णायक…

या मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बहुतांश गावाचा समावेश असल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार ठरविण्यात काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील सहभाग राहण्याची चिन्हे आहेत. थोरात यांच्या शब्दावर या भागातील मतदान फिरत असल्याने थोरात यांना देखील उमेदवारी देताना विश्वासात घेतले जाईल, असे राजकीय वर्तुळातील बातमी आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 858
उमेदवारी अर्ज किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar07/10/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला…

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.