Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

07/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर विधानसभा मतदारसंघातून या इच्छुकांना उतरायचेय मैदानात! यांनी नेले २५ उमेदवारी अर्ज
निवडणूक

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून या इच्छुकांना उतरायचेय मैदानात! यांनी नेले २५ उमेदवारी अर्ज

अर्ज नेल्यांपैकी कोण शेवटपर्यंत मैदानात टिकते याकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २२ ऑक्टोंबर 

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अकरा इच्छुकांनी पहिल्याच दिवशी पंचवीस उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठीची रंगत आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व गेल्या चार दशकांपासून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात करत आहेत. दरवेळी त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या उमेदवार विरोधी पक्षांकडून देण्यात आला. यावेळी देखील विरोधी पक्षाकडून कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे यांनी तेथील पराभव जिव्हारी लागल्याने या मतदारसंघात थोरात यांच्या विरोधात जोरदार प्रचार मोहीम राबविली असली तरी ते उमेदवार असतीलच याबाबत मात्र साशंकता आहे. शिवाय ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने हे भारतीय जनता पक्षाला मिळेल का याबाबत देखील द्विधा स्थिती आहे.

थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक असले तरी त्यांना लढत देऊ शकेल असा उमेदवार अद्याप तरी विरोधी पक्षांकडे दिसत नाही. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा कोणाला जाते आणि शेवटच्या क्षणी कोणाला संधी मिळते, यावर या मतदारसंघाची गणित अवलंबून असतील.

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. मात्र या मतदारसंघात ११ इच्छुकांनी २५ उमेदवारी अर्ज नेले असून एकाही उमेदवाराचा अर्ज पहिल्या दिवशी दाखल झाला नाही. संगमनेर मतदार संघातून यावेळी किती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरतात याची देखील उत्सुकता आहे.

मंगळवारी उमेदवारी अर्ज नेणाऱ्या इच्छुकांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात उमेदवारी अर्ज) 

भागवत धोंडीबा गायकवाड (४), शिवाजी दत्तू आरगडे (२), अविनाश हौशीराम भोर (जय हिंद नवभारत रहीम पार्टी) (१), सूर्यभान बाबुराव गोरे (बहुजन समाज पार्टी) (०२), संदीप भाऊ मोकळ (वंचित बहुजन आघाडी) (०४), कांदळकर गोविंद गमाजी (१), बाळासाहेब मारुती नवले (१), अल्ताफ इब्राहिम शेख (१), शशिकांत विनायक दारोळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) (२), ऋषिकेश चंद्रकांत आरोटे (४) व अजय गणपत भडांगे (२)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,976
उमेदवारी अर्ज विधानसभा निवडणूक शैलेंद्र हिंगे संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार, ०७ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar07/10/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला…

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.