Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा अपहार प्रकरणी चेअरमन भाऊसाहेब कुटेच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय… कुटेंची दिवाळी कारागृहातच
गुन्हेगारी

दूधगंगा अपहार प्रकरणी चेअरमन भाऊसाहेब कुटेच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय… कुटेंची दिवाळी कारागृहातच

न्यायालयाच्या निर्णयाने ठेविदारांनी केले समाधान व्यक्त
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/10/2024Updated:23/10/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २४ ऑक्टोंबर

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून जामीन मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुख्य आरोपी चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या जामीन अर्जावर मंगळवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला. यामुळे कुटेंची दिवाळी आता कारागृहात साजरी होणार आहे. ऐन दीपावलीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निर्णय दिल्याने ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा आर्थिक घोटाळा समोर आला लेखा परीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुमारे ८१ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याच्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींत पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज (छत्रपती संभाजीनगर), दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, अमोल कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर सोनाली दादासाहेब कुटे, अमोल ट्रेडिंग कंपनी प्रोप्रायटर दादासाहेब भाऊसाहेब कुटे, श्री डेव्हलपर्स संदीप भाऊसाहेब कुटे (सर्व संगमनेर), यांच्यासह कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम (सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) व संदीप दगडू जरे (रा. अहमदनगर) यांच्यासह त्यांना सहाय्य करणाऱ्या तत्कालीन लेखापरीक्षकांचा आरोपींमध्ये समावेश होता.

बँकेच्या व्यवस्थापकासह काही आरोपींना गुन्ह्याचा तपास करणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अटक केली होती. त्यानंतर आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. दरम्यानच्या काळात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बहुतांश आरोपींचे जामीन अर्जदेखील फेटाळून लावले होते. मात्र गुन्ह्याच्या तपासादरम्यान तपास यंत्रणा मुख्य आरोपी, त्याचे कुटुंबीय आणि अन्य काही बड्या आरोपींवर मेहरबान असल्याचे वारंवार आरोप झाले. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळूनदेखील तपास यंत्रणा आरोपींना अटक करू शकली नाही. तसेच याबाबत नेमका काय तपास झाला याचीदेखील माहिती माध्यमांना आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळू शकलेली नाही.

मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्या कुटुंबीयांना थेट सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भाऊसाहेब कुटे पोलिसात हजर झाले. त्या वेळेपासून ते अटकेत आहेत. दरम्यानच्या काळात उपचाराच्या नावाखाली संबंधित यंत्रणाकडून त्यांची बडदास्तदेखील ठेवली गेली असल्याचे आरोप झाले. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’सह काही माध्यमांनी यावर आवाज उठविल्यानंतर कुटेची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली.

आपला या गुन्ह्यात संबंध नसून आपली जामीनावर मुक्तता करण्यात यावी, यासाठी आरोपीने संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी सुरू होती. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याला जामीन देण्यास सहाय्यक सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते, ठेवीदारांच्यावतीने काम बघणाऱ्या ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी जोरदार विरोध केला. बँकेच्या होणाऱ्या सर्वच व्यवहारांना अन्य कर्मचारी, अधिकाऱ्यांप्रमाणेच बँकेचे चेअरमनदेखील तेवढेच जबाबदार असतात असा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला. तर आरोपीच्या वकिलांनी देखील आरोपीचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे सांगत जामिनावर मुक्त करण्याची मागणी केली होती.

न्यायाधीश मनाठकर यांनी याप्रकरणी संबंधित वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी कुटेचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळला गेल्याने ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे. जामीन अर्ज फेटाळला गेल्याने कुटेला आता उच्च न्यायालयात जामिनासाठी जावे लागणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 13,935
जिल्हा व सत्र न्यायालय दूधगंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.