Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुजय विखे यांच्या संगमनेरमधील सभेत जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, महिला संतप्त… विखेंना विचारला जाब… वाहनाची जाळपोळ, तोडफोड संगमनेरात तणाव
महाराष्ट्र संवाद विशेष

सुजय विखे यांच्या संगमनेरमधील सभेत जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, महिला संतप्त… विखेंना विचारला जाब… वाहनाची जाळपोळ, तोडफोड संगमनेरात तणाव

वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याने विखे-थोरात वाद चिघळला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/10/2024Updated:25/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सभा आटोपती घ्यावी लागली, महिलांसह ग्रामस्थांचा सभास्थानी ठिय्या..

सुजय विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, वसंत देशमुखला भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे अशा नीच लोकांना त्यांची जागा दाखविण्याची – आमदार सत्यजित तांबे

शुक्रवार, २६ ऑक्टोबर

संगमनेर – सुसंस्कृत तालुका अशी ओळख असलेल्या संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने थेट खालच्या पातळीवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संगमनेरमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळाव्यात महिलांचा संताप दिसून आला. विखे-थोरात वाद विकोपाला गेला असून वाहनाची देखील जाळपोळ, तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे संगमनेर तालुक्यात युवा संकल्प मेळावे घेत आहे. शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलताना वसंतराव देशमुख यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे महिलांचा संताप उफाळून आला. सभेमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान हा प्रकार इतरत्र समजताच अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सभास्थळी धाव घेतली. यावेळी सुजय विखे यांचे भाषण सुरू होते. सुजय विखेही सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करत असल्याचे आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्याची संस्कृती ही अत्यंत चांगली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून विखे यांनी सातत्याने विकृत वक्तव्य करून समाजामध्ये अशांतता पसरवण्याचे काम केले आहे. याचबरोबर महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. हे भाषण सुरू असतानाच महिलांचा लोंढा सभास्थळी येत होता. काही कार्यकर्त्यांनी या महिलांना अडवले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने विखे यांनी भाषण आटोपते घेतले.

सर्वत्र गंभीर वातावरण झाले असताना सभा संपून तातडीने निघत असताना महिलांनी सुजय विखे, वसंतराव देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. हे वृत्त समजतात संगमनेर तालुक्यात व शहरात अनेक ठिकाणी या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात येत असून तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याचबरोबर विखे यांच्या समवेत लोणीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या संगमनेर तालुक्यातील तरुणांनी अडवल्या. यावेळी संगमनेर तालुक्यातील युवक व राहता तालुक्यातील व लोणी परिसरातील युवकांमध्ये बाचाबाची निर्माण होऊन तणावपूर्ण वातावरण झाले आहे.

दरम्यान सुजय विखे, वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हजारो थोरात समर्थकांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला होता. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी आदी प्रमुखांचा यात समावेश होता.

https://x.com/satyajeettambe/status/1849875688771236003?s=19

सत्यजित तांबे यांचे ट्वीट… परत वेळ आली आहे नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची…

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241025-WA0072.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 29,023
आक्षेपार्ह जयश्री थोरात डॉक्टर सुजय विखे धांदरफळ खुर्द बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- उडीसा आणि आसाम या राज्यांतून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी…

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.