Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलांचा अपमान ही येथील संस्कृती नाही, वसंत देशमुख यांचे वक्तव्य निषेधार्हच – कैलास कासार
राजकारण

महिलांचा अपमान ही येथील संस्कृती नाही, वसंत देशमुख यांचे वक्तव्य निषेधार्हच – कैलास कासार

वसंत देशमुख यांच्या बद्दल संतापाची लाट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2024Updated:26/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २६ ऑक्टोबर

माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या धांदरफळ खुर्द येथील युवा संकल्प मेळाव्यात बोलताना वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांच्याविषयी खालच्या पातळीवर आक्षेपार्ह विधान करून वाद ओढवून घेतला. ही संगमनेरच्या राजकारणाची संस्कृती नसून या घटनेचा निषेध करत असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख कैलास कासार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना कैलास कासार म्हणाले, निवडणूक अथवा कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्याचा, कामांबद्दल प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार राज्यघटनेने सर्वच नागरिकांना दिला आहे. मात्र ही टीकाटिप्पणी करताना कुठल्याही महिला संदर्भात बोलताना शब्दांचा संयम बाळगणे गरजेचे आहे. माइक हातात आला म्हणून काहीही बोलत सुटायचे हे योग्य नाही.

सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण सुरू असून त्या पार्श्वभूमीवर महायुतीचे माजी खासदार सुजय विखे पाटील संगमनेर तालुक्यात युवा संकल्प मेळावा घेत आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत. मात्र निवडणुकीच्या विषयावरून स्थानिक आमदारांना प्रश्न विचारणे, त्यांच्या कार्यक्षमतेबाबत टीका टिप्पणी करणे आणि आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवणे हा सर्वांचाच अधिकार आहे. शब्दांचा संयम बाळगून राजकीय व्यासपीठावरून भाषणे होणे अपेक्षित आहे.

देशमुख यांनी भाषणावेळी डॉ. जयश्री थोरात यांच्या विषयी केलेल्या विधानामुळे तालुक्यात सर्वत्र संताप निर्माण झाला आहे. थोरातच नव्हे तर कोणत्याही महिलेविषयी अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे आपली बौद्धिक पातळी खालावल्याचे लक्षण आहे. तालुक्यात अशा प्रकारे महिलांवर अथवा त्यांच्या चारित्र्यावर टीकाटिप्पणी करण्याचे प्रकार कुठल्याही व्यासपीठावरून होणे योग्य नाही याची देखील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

सदरचा प्रकार महायुतीच्या व्यासपीठावरून घडला असला तरी महायुतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही देखील त्याचे समर्थन करत नाही उलट घडलेला प्रकार हा निषेधार्हच असल्याने त्याचा निषेध करत असल्याचे व सध्याच्या राजकारणाची पातळी घसरत असल्याचे दिसू लागले आहे असे देखील शेवटी कासार यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 4,092
कैलास कासार निषेध
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.