Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
निवडणूक

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २७ ऑक्टोबर

अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रीया पारदर्शक राहील याकडेही लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, संपूर्ण निवडणुक कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी यादृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. निवडणूक विषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यात कुणालाही सूट देवू नये. कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवावे. आनंददायी मतदान केंद्र असावे अशा निवडणूक आयोगाच्या सूचना असल्याने त्यादृष्टीने मतदारांसाठी किमान सुविधा कराव्यात.

मनुष्यबळ आणि ईव्हीएम यंत्राच्या दुसऱ्या सरमिसळचे नियोजन करावे. १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आयोजित करावे, तसेच मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठीही प्रशिक्षण आयोजित करावे. मतदान कर्मचाऱ्यांच्या सुविधेबाबतही नियोजन करावे. मतदानाच्यावेळी वेबकास्टींगची सुविधा करण्यासाठी आतापासून नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रवीण महाजन यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या. यावेळी टपाली मतदान प्रक्रीयेबाबत आढावा घेण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 391
आचारसंहिता विधानसभा निवडणूक सिद्धाराम सालीमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहर व परिसरातील गरीब, गरजू आणि होतकरू युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी…

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.