Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी आणि भाजपचे शहर प्रमुख श्रीराम गणपुले यांच्यात वाद, पालकमंत्री राधाकृष्ण विखे थेट पोलीस ठाण्यात… नेमकं काय घडलं
गुन्हेगारी

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी आणि भाजपचे शहर प्रमुख श्रीराम गणपुले यांच्यात वाद, पालकमंत्री राधाकृष्ण विखे थेट पोलीस ठाण्यात… नेमकं काय घडलं

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2024Updated:30/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २९ ऑक्टोबर 

एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर नवीन नगर रस्त्यावर ठाकरे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी आणि भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख श्रीराम गणपुले यांच्यात वाद झाले. महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी शहरात आलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस ठाण्यात जात पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची आणि आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मंगळवारी दुपारी झालेल्या या वादाचे वृत्त शहरात पसरल्याने पोलीस ठाण्यात अनेकांनी गर्दी केली होती. दुपारी गणपुले नवीन नगर रस्त्यावर असताना तेथे आलेल्या कतारी यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोघांमधील वादाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विखे शहरात आले होते. महायुतीच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचे वृत्त समजल्यानंतर ते लगेचच पोलीस ठाण्यात गेले. पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्यासह पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी कतारी यांच्यावर तातडीने कारवाई करून अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

दरम्यान विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर संगमनेर शहर आणि तालुक्यात हिंसक घटना घडत असून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. निवडणुक प्रचारादरम्यान हाणामारीच्या घटना घडू लागल्याने संगमनेर शहर व संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या पार्श्वभूमीवर काही गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे तणावपूर्ण बनलेले संगमनेर शहर निवडणुकीदरम्यान वेगळ्या मार्गावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 45,199
अमर कतारी श्रीराम गणपुले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.